राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणार्‍यावर कडक कारवाई करण्याची डिग्रस ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी , कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा .

राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणार्‍यावर कडक कारवाई करण्याची डिग्रस ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी , कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा .

राहुरी तालुक्यातील डिग्रस येथिल ग्रामस्थांनी गावातील अनधिकृत रहिवाशी, बांधकाम व देशविरोधी घातक कट कारस्थान या संदर्भात कारवाईसाठी राहूरी पोलिस स्टेशन व तालुका दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .

 देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की, आम्ही सर्व डिग्रस येथील ग्रामस्य व रहिवासी अर्ज करीतों की, आमच्या गावामध्ये दि. ११/०२/२०२३ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द झालेल्या पेपरमधील बातमी तसेच सर्व ग्रामस्थांना आलेल्या निदर्शनामुळे सदर गावामध्ये व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम करुन वास्तव्य करणारे लोक व हिंदु धर्माचे अराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे आयोध्या येथील मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे दाम्पत्य उत्तर प्रदेश पोलीसांनी त्यांना आमच्या गावातून अटक केली आहे व हे दाम्पत्य कित्येक दिवसांपासून 'देशविरोध कार्यवाही करण्यासंदर्भात कट कारस्थाने करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच सदर दाम्पत्याने इतर अनोळखी लोक आणून अनाधिकृत शासकीय जागेत लोकवस्ती करून सदर जागेत मोठया प्रमाणात त्यांची अनधिकृत धार्मिक स्थळे निर्माण करुन सामाजीक स्थैर्य बिघडविण्याचे काम मोठया प्रमाणात होत आहे. तसेच त्या व्यक्तींकडे अनेक बोगस आधार कार्ड व इतर कागदपत्रे आढळून आली आहेत व इतर व्यक्तींकडे आढळण्याची दाट शक्यता आहे.

तसेच या जागेमध्ये देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन सदर परिसरामध्ये अतिरेकी कारवाया साठी मोठया प्रमाणात लोक तयार केले जातात अशी स्थानिक ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरु आहे. त्या दृष्टीने भविष्यामध्ये सदर परिसरातील व्यक्तींच्या कृत्यांमुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे देशहिताच्या सुरक्षीतेच्या दृष्टीकोनातून कठोर तपास करणे गरजेचे आहे.

तरी सदर अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी. सदर कार्यवाही न झाल्यास समस्थ ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे .