नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव हे अध्यात्मिक विचारधारेचे गाव -श्री स्वामी अमोघानंदजी महाराज

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव हे अध्यात्मिक विचारधारेचे गाव -श्री स्वामी अमोघानंदजी महाराज

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगा

व येथे विश्वशांतीसाठी कार्यरत असलेले दिव्य ज्योती जागृती संस्थानचे संस्थापक व संचालक सद्गुरु सर्वश्री आशुतोष महाराजजी यांचे शिष्य श्री स्वामी अमोघानंदजी यांनी मंगळवार दिनांक 15 मार्च 2022 रोजी बालाजी देडगाव देवस्थानला सदिच्छा भेट दिली, यावेळी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष श्री नवनाथ पाटील मुंगसे व सचिव श्री रामानंद पाटील मुंगसे यांनी बालाजी विश्वस्त मंडळाच्या वतीने स्वामीजींचा सन्मान केला. स्वामीजींनी सत्संगच्या माध्यमातून बालाजी देडगाव हे धार्मिक प्रवृत्तीचे आणि चांगल्या विचारधारेचे गाव असून बालाजी देवस्थानच्या माध्यमातून अध्यात्मिक व सामाजिक कार्य घडावे व चांगल्या समाजाची निर्मिती होऊन विश्वशांतीसाठी योगदानाची अपेक्षा व्यक्त केली. भारतीय संस्कृतीचा महिमा, भारत देशाची ऋषी परंपरा, मानवी जीवनामध्ये सदगुरुची आवश्यकता, ब्रह्मज्ञान, सत्कार्य, समाजात वाढत चाललेली अशांती, व्यसनाधीनता, मनोविकार, मनशांती, अध्यात्माच्या नावाखाली चाललेली अंधश्रद्धा अशा अनेक विषयावर मार्गदर्शन केले. संस्थानच्या विश्वस्तरावरील अध्यात्मिक व सामाजिक कार्याची माहिती देताना पुढील येणाऱ्या काळामध्ये देडगावामध्येही आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी बालाजी देवस्थान विश्वस्त मंडळा बरोबर दिव्य ज्योती जागृती संस्थान कार्य करेल असे सांगितले. या कार्यक्रमाला ह.भ.प. सुखदेव महाराज मुंगसे,श्री बाळ देवा तांदळे , श्री सचिन सोनटक्के , श्री आसाराम पाटील मुंगसे,माजी सरपंच श्री दत्ता पाटील मुंगसे, ज्येष्ट पत्रकार बन्सी भाऊ एडके,श्री बलभीम घोडके, श्री बहीरनाथ एडके, श्री सुभाष पाटील मुंगसे, देवस्थान चे विश्वस्त रामभाऊ कुटे,विनायक माळवदे, वसंत नागरे,श्री दत्तात्रेय कुटे मेजर, ,श्री मच्छिंद्र पाटील मुंगसे , झाकीर पठाण, जयहारी संजय मुंगसे ,उत्तम तांबे,आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गणेश एडके सर यांनी केले, आभार देवस्थानचे सचिव श्री रामानंद पाटील मुंगसे यांनी तर सूत्रसंचालन पत्रकार श्री. इन्नुसभाई पठाण यांनी केले.