खेडले परमानंद ग्रामपंचायती कडून नाकात मोती ओवलेल्या वशिल्याच्या तट्टूंना मेन लाईनला नळ कनेक्शन तर गरिबांची पिळवणूक.

खेडले परमानंद ग्रामपंचायती कडून नाकात मोती ओवलेल्या वशिल्याच्या तट्टूंना मेन लाईनला नळ कनेक्शन तर गरिबांची पिळवणूक.

दिल्ली 91 न्यूज वृत्तांत

खेडले परमानंद ग्रामपंचायती कडून नाकात मोती ओवलेल्या वशिल्याच्या तट्टूंना मेन लाईनला नळ कनेक्शन तर गरिबांची पिळवणूक.

        सोनई - करजगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या वितरणामध्ये खेडले परमानंद ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्मा  वितरणामध्ये मोठा सावळा गोंधळ दिसून येत आहे.

गावातील सर्व सामान्य लोकांना पाणी वितरण करताना फाटे वापरले जातात गोरगरिबांना तीन- चार दिवसा मिळून पाणी येते.जिथे फाटे बसवलेले आहेत त्या वालच्या ठिकाणी किडे पडलेले आहेत.

        तर या उलट परिस्थिती अशी आहे गावातील नाकात मोती ओवललेल्या श्रीमंत लोकांना दैनिक म्हणजे अगदी रोजच्या रोज पाणी पुरवठा अगदी मुबलक स्वरूपात होत असतो .

       दलित वस्ती ,आदिवासी वस्ती व गावातील इतर सर्व सामान्य नागरिकांना अशा प्रकारची वागणूक लोकशाहीच्या दृष्टीने कितपत हितकारक आहे.हा प्रश्न उपस्थित होत आहे.

   नळ योजना 14 /5/2017 कार्यान्वित झाल्यापासून हा प्रकार सुरू आहे मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते.    

या वशिल्याच्या तट्टूंना ही सवलत कशासाठी ग्रामपंचायत प्रशासन देत आहे हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
      या गोष्टीकडे सरपंच व प्रशासकीय यंत्रणा लक्ष देणार का ?