नेवासा तालुक्यातील वडाळ्याजवळ अवैधरित्या सुरु असलेल्या गॅस सिलेंडरच्या रॅकेटवर छापा .

नेवासा तालुक्यातील वडाळ्याजवळ अवैधरित्या सुरु असलेल्या गॅस सिलेंडरच्या रॅकेटवर छापा .

नेवासा तालुक्यातील कांगोणी फाट्यापासून वडाळ्याकडे एक किलोमीटर अंतरावर आप्पासाहेब शहराम मोटे यांच्या मालकीच्या जमिनीत हॉटेल साई सुबरी च्या पाठीमागे आडोशाला एका टपरीत सिलेंडर गॅस चे मोठे रॅकेट सुरू होते.

         नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सदरची कारवाई पुरवठा अधिकारी रूपाली गोडसे यांनी यावेळी सदर कारवाईदरम्यान उपविभागीय पोलीस पोलीस अधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने भेट दिली.या कारवाई पथकामध्ये ज्ञानेश्वर साळवे, संतोष वाघ व रमेश लबडेहे सहभागी होते.

      सदरच्या कारवाईमध्ये 92 मोकळ्या कमर्शियल टाक्या, 35 भरलेल्या कमर्शियल टाक्या, घरगुती अर्धवट भरलेली टाकी,एम एच सोळा सीसी २४८८ हार टेम्पो, प्लास्टिक नळ्या, नोजल, पान्हा व गॅस भरण्यासाठी लागणारे इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते.सदर गुन्ह्यातील आरोपीचे नाव अद्यापही निष्पन्न झाले नाही .