"सकल ख्रिस्ती समाज" श्रीरामपूर विभागच्या वतीने श्रीरामपूर येथे भव्य शांतता फेरी काढण्यात आली.

"सकल ख्रिस्ती समाज"  श्रीरामपूर विभागच्या वतीने श्रीरामपूर येथे भव्य शांतता फेरी काढण्यात आली.
"सकल ख्रिस्ती समाज"  श्रीरामपूर विभागच्या वतीने श्रीरामपूर येथे भव्य शांतता फेरी काढण्यात आली.

श्रीरामपूर :- सोमवार दि.१०/७/२०२३रोजी सकाळी ठीक १०:००वाजता "सकल ख्रिस्ती समाज" श्रीरामपूर विभागच्या वतीने भव्य शांतता फेरी काढण्यात यश आले आहे.

            मणिपूर येथे घडत असलेल्या घटनांबद्दल ख्रिस्ती धर्मियांनी आपल्या आंतरिक संवेदना भव्य शांतता फेरीद्वारे व्यक्त केल्या आहेत. विविध  ख्रिस्ति  समाजाच्या  वतीने मा. प्रांताधिकारी साहेब श्रीरामपूर यांना निवेदन दिले आहे. यासाठी सर्व ख्रिस्तीपंथच नव्हे तर मुस्लिम व बौद्ध समाज एक होऊन, ऐक्य सद्भावनेतून, प्रेरणेने व प्रितीने या शांतता फेरीत सहभागी झालेला दिसून आला आहे.

"सकल समाज"या ध्येयाने ही शांतता फेरी घडवून आणली व यामध्ये कूठलाही अनूचित प्रकार घडलेला नाही याची काळजी आयोजकांनी घेतली . या फेरीमध्ये श्रीरामपूर शहर, तसेच आसपासची गावे व शहरे यांतील सर्व ख्रिस्ती पंथीय धर्मगूरू व बंधू—भगीनी सहभागी झाले . शासकीय निवृत्त अधिकारी, कर्मचारी मणिपूर येथील हिंसक हल्यात मृत पावलेल्यांना व नातेवाईकांना न्याय मिळावा यासाठी सर्व पंथीय एकत्रित येऊन शांती मोर्चा आज सकाळी ठीक १०:०० वाजता श्रीरामपूर रेल्वे स्टेशन समोरील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  स्मारकास पुष्पहार अर्पण करून सुरू झाला. 

             शातता फेरीचा मार्ग डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारकास अभिवादन केल्यानंतर तेथुन पोलिस स्टेशन, नेहरू मार्केट ,सैय्यद बाबा चौक पासुन  लक्ष्मी थियटर  या मार्गाने मा. प्रांत कार्यालयाच्या आवारात शांतीने ,प्रितीने, घोषना न देता हातात फलक घेऊन समाज जमा झाला. 

         सर्व रेव्ह फादर्स सिस्टर्स व पास्टर्स  यांना विनंती केल्या प्रमाने , सर्व आपआपल्या चर्चमधुन  रविवारी शांती फेरीत सामील झालेले दिसले.

         प्रांत कार्यालयाच्या आवारात पोहचल्यावर  सदर सकल शांती फेरीत सहभागी समाजाचे सभेत रुपांतर झाले. लोयोला सदनचे मुख्य रेव्ह फा. ज्यो गायकवाड यांनी सदर सहभागी समाजास सकल शांतता फेरीचा उद्देश, विविधतेने नटलेल्या या भारतात विविध प्रांत भाषा जाती धर्माचे लोक येथे आनंदाने राहत असता  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्य घटनेकडे सर्व जग मोठ्या आदराने बघते आहे. शासनाने मणिपूर राज्यातील ख्रिस्ती समाजावरील अन्याय दुर करण्यास ख्रिस्ती समाजाच्या वतीने नम्र विनंती  केली. विविध संघटना पदाधिकारी यांची मणिपूर येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी शासना पर्यंत या सकल शांतता फेरीची, ख्रिस्ती समाजाची विनंती मा. प्रांत अधिकारी, श्रीरामपूर यांनी पोहचवावी या संदर्भात थोडक्यात भाषणे झाली. 

          मा. प्रांताधिकारी, श्रीरामपूर यांना सकल ख्रिस्ती सकल समाजाच्या वतीने दिले जाणारे निवेदनाचे वाचन डाॅ. प्रविणराजे शिंदे यांनी केल्यानंतर मा. प्रांताधीकारी श्रीरामपूर यांना सदरील निवेदन सुपूर्द करण्यात आले. जमलेल्या ख्रिस्ती समाजास सदरील निवेदन शासन दरबारी  पोहचवण्यात येईल याची मा. प्रांताधिकारी श्रीरामपूर यांनी जमलेल्या जनतेला खात्री दिली. सर्वांना याच प्रकारे शांततेत राहण्यासाठी विनंती केली. 

        श्री. कमलाकर पंडित यांनी उपस्थित सर्व रेव्ह फादर व सिस्टर्स व रेव्ह पास्टर व या सकल शांतता फेरीत सहभागी झालेले सर्व ख्रिस्ती धर्म माता बंधू-भगिनींचे आभार मानले. या सकल शांती फेरीसाठी पाणी व फलक देणारांचे तसेच मा. तालुका व शहर पोलीस निरीक्षक, पोलीस डिपार्टमेंट कर्मचारी यांचे आभार मानले. आशीर्वाद प्रार्थना होऊन राष्ट्रगीताने सदरील सभा संपली असे जाहीर करण्यात आले.  Delhi91.com bps live news.......रिपोर्टर...प्रकाश निकाळे..  श्रीरामपूर.