फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने गणेश उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.
बालाजी देडगाव (
(
प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाठीमागे फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने गणेश चतुर्थी निमित्त गणेश उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.
दरवर्षी फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने गणेश उत्सवाचे आयोजन मोठ्या थाटामाटात केले जाते. तर याही वर्षी तांदळे देवा यांच्या शुभहस्ते व प्रो .कबड्डी खेळाडू महाराष्ट्र टीमचे कॅप्टन शंकर गदाई व प्रो. कबड्डी उत्तम खेळाडू राहुल धनवडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून गणरायाचे थाटामाटात पूजन करण्यात आले. तर फ्रेंड्स ग्रुप व देडगाव ग्रामस्थ यांच्या वतीने प्रमुख पाहुणे शंकर गदाई व राहुल धनवडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी अहिल्याबाई होळकर शाळेचे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड ,प्रमोद थोरात, अभिजीत ससाणे, आकाश चेडे ,पोपट बनसोडे या मान्यवरांच्या शुभहस्ते आरती घेण्यात आली. तर या सोहळ्यासाठी फकीरचंद हिवाळे, आशिष हिवाळे, लक्ष्मण सकट, रियाज सय्यद, कुलदीप कुलट, सचिन कदम , आबासाहेब बनसोडे व आदी फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोलाचे कष्ट घेत आहेत.