निळ्या झेंड्याचा अवमान केल्याने वंचित बहुजन आक्रमक नेवासा पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना निवेदन.

निळ्या झेंड्याचा अवमान केल्याने वंचित बहुजन आक्रमक नेवासा पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना निवेदन.

नेवासा (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील कुकाना येथे देि.२५ रोजी नेवासा पोलिस स्टेशन अंतर्गत कुकाना पोलीस दूरक्षेत्र येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निळ्या झेंड्याचा अवमान प्रकरणी नूतन पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले .

      औरंगाबाद ,छत्रपती संभाजीनगर नामकरण प्रकरणात काही मोर्चे, निदर्शने झाली. त्यामध्ये निळ्या झेंड्याचा तात्पुरता वापर करण्यात आला. व त्या झेंड्याच्या कोणताही अभिमान न बाळगता काही समाज कंटकांनी तो झेंडा रस्त्यावर फेकून देऊन त्याची विटंबना झाली, अवमान झाला. हा खूप निर्लज्जेतेचा कळस झाला. म्हणून वंचित बहुजन समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा समाजकंटकामुळे महाराष्ट्र पेटून उठेल व समज्या ,समाज्यात वाद निर्माण होउन . दंगल सारखे प्रकार घडू शकतात.म्हणून अशा गैर वर्तन करणाऱ्या वर कडक कारवाई व्हावी असे निवेदन पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांना देण्यात आले.

     यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते उत्तम (बलभीम) सकट, सामाजिक कार्यकर्ते सलिमभाई शहा, मातंग समाजाचे जिल्हाध्यक्ष पोपटराव सरोदे, युवा नेते श्रीकांत हिवाळे, अशोकराव मिसाळ, नितीन गोर्डे, संदिप चाबूक स्वार, राहुल चाबूक स्वार, आशुतोष घुटे, सचिन साठे, आकाश मिसाळ व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

.