मातोश्री च्या पुण्यस्मरण निमित्त शालेय साहित्याचे वाटप करून केले मातृऋण अदा.

मातोश्री च्या पुण्यस्मरण निमित्त शालेय साहित्याचे वाटप करून केले मातृऋण अदा.

मातोश्रींच्या पुण्यस्मरणानिमित्त शालेय साहित्याचे वाटप 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी इनुस पठाण )- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी त्यांच्या मातोश्री स्व. लक्ष्मीबाई परसराम एडके यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा खरेदी विक्री संघाचे माजी संचालक कडुभाऊ तांबे होते. 

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ नागरिक बाळ देवा तांदळे,

रघुनाथ कुटे, युवा नेते निलेश कोकरे, भाजप युवा मोर्चाचे आकाश चेडे, अरुण वांढेकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे, श्री गणेश उद्योग समूहाचे मालक विलास मुंगसे, बंडूभाऊ कुटे, नागेबाबा मल्टिस्टेटचे शाखा अधिकारी  पांडुरंग एडके,अविनाश हिवाळे, फकीरचंद हिवाळे, नितीन ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षकांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

यावेळी व्यापारी संघटनेचे किशोर मुंगसे, पत्रकार बन्सीभाऊ एडके, मुख्याध्यापक सतिश भोसले सर, कदम मॅडम, धामणे सर , बथूवेल डी .हिवाळे सर,यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब सावंत यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार युनुस पठाण यांनी केले. तर निलेश कोकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.