"करूणा माता चर्च व पवित्र क्रूस तीर्थक्षेत्र,वार्षिक यात्रा सोहळा १० फेब्रुवारी २०२४ रोजी भक्तीभावाने साजरा."

"करूणा माता चर्च व पवित्र क्रूस तीर्थक्षेत्र,वार्षिक यात्रा सोहळा १० फेब्रुवारी २०२४  रोजी भक्तीभावाने साजरा."
"करूणा माता चर्च व पवित्र क्रूस तीर्थक्षेत्र,वार्षिक यात्रा सोहळा १० फेब्रुवारी २०२४  रोजी भक्तीभावाने साजरा."

छत्रपती संभाजीनगर (वैजापूर) :- दि १० फेब्रुवारी २०२४, करूणा माता चर्च व पवित्र क्रूस तीर्थक्षेत्र,वार्षिक यात्रा सोहळा १० फेब्रुवारी २०२४

करिता, करुणा माता चर्चचे प्रमुख धर्मगुरु व करुणा निकेतन शाळा, वैजापूरचे प्राचार्य, रेव्ह फा. संजय ब्राह्मणे आणि चर्चचे सर्व भाविक व सदस्य, तसेच शाळेचे शिक्षक व विद्यार्थी तर्फे छत्रपती संभाजीनगर धर्म प्रांताचे नवनिर्वाचित बिशप सन्माननिय Rev. Bishop Barnard Lancy Pinto यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

       दुपारी २:०० वाजता भजन गायन कार्यक्रम सुरु झाला, सांयकाळी ५:३० वा. महागुरुस्वामी रा. रेव्ह फा. आंब्रोज रिबेलो व नवनियुक्त महागुरुस्वामी रा. रेव्ह. फा. बर्नाड लॅन्सी पिंटो व उपस्थित धर्मगुरुयांचे मिरवणुकीने भव्य स्वागत करण्यात आले. सायंकाळी जवळपास ६ वाजेच्या दरम्यान संगीतमय पवित्र मिस्सा बलिदान प्रमुख याजक म्हणून सन्मानिय महागुरुस्वामी रा. रे. बिशप आंब्रोज रिबेलो यांनी केले, तर या मिसा बलिदानाचे प्रवचनकार नवनियुक्त महगुरूस्वामी रा. रेव्ह. फा. बर्नाड लॅन्सी पिंटो यांनी मंत्र मुग्धकरणारे प्रवचन हे प्रभुची दया, माता मरियमची माया व कुरुणा आपणास मिळावी यावर सुंदर असे प्रबोधन व प्रार्थना केली. या यात्रेसाठी उपस्थित सर्व सन्माननिय धर्मगुरू, धर्मभगिनी व पंचक्रोशीतील सर्व भाविक मोठ्या भक्ती भावाने व मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच या यात्रेसाठी वसई व मुंबई या ठिकाणा वरुन धार्मिक भाविक या मिस्सा मध्ये उपस्थित राहिले. सर्व धर्मीयांनी एकोप्याने राहणे साठी प्रार्थना केली गेली. स्व. रेव्ह फादर मायकल यांना दोन मिनीटे श्रध्दांजली वाहण्यात आली.  प्रमुख याजक पद भूषविलेले असे बिशप आंब्रोज रुबेलो यांचे सर्व सिस्टर व भाविकांच्या वतीने रेव्ह फा संजय ब्राह्मणे यांनी आभार मानले, तसेच सर्व उपस्थित सहभागी फादर्स यांचेही आभार मानले. त्याच प्रमाणे शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व  विद्यार्थी, सर्व स्वयंसेवक यांचे आभार मानले. स्व. रेव्ह. फा. मायकल यांचेही आभार मानले. पिण्यासाठी पाणीपुरवठा केल्या बद्दल नगरपालिका वैजापूर व मा. आमदार श्री बोरणारे सर यांचेही त्यांनी शाळेसाठी व चर्च साठी पेव्हर ब्लॉक व शेडची सुविधा देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल,  तसेच माजी नगराध्यक्ष अकिल शेख यांनी या तिर्थक्षेत्रस ७० हजाराचे वाॅटर फिल्टर देण्याचे आश्वासन दिले, नगरपालीकाआध्याक्षा शिल्पाताई यांचीही उपस्थिती या ठिकाणी होती, त्यांचेही तसेच श्री. धोंडीराम राजपुत वैजापूर मधील कार्यकर्ते त्यांचेही आभार मानले. सर्व उपस्थित सन्मानित रेव्ह फादर व सिस्टरांचे शाॅल व पुष्प गुच्छ देवून सन्मान करण्यात आला. मा. बिशप रा. रेव्ह फा. आंब्रोज रुबेलो यांचे उद्बोधक पर भाषा झाले. मा. आमदार  श्री बोरणारे सर यांचे बिझी शेड्यूल असतांनाही त्यांनी उशिराने का होईना या तिर्थक्षेत्री येवून सर्व भाविकांना यात्रे निमित्ताने शुभेच्छा दिल्या. रेव्ह फादर संजय यांनी त्यांचे स्वागत व पुष्पगुच्छ व शाॅल देवून सन्मान केला.या तिर्थक्षेत्री सर्व धर्मीयांची उपस्थिती व दान धर्म करण्यासाठी पुढाकार दिसुन आला. ज्या भाविकांनी या तिर्थक्षेत्र उभारणी साठी मदत केली त्यांचे सर्वांचे आभार मानले. सर्व उपस्थित भाविकांना भोजन देण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. पारखे सरांनी उत्कृष्ट पध्दतीने केले.