तहसीलदार संजय बिराजदार यांच्या उपस्थितीत वरखेड येथील महालक्ष्मी यात्रेचे आयोजन.

तहसीलदार संजय बिराजदार यांच्या उपस्थितीत वरखेड येथील महालक्ष्मी यात्रेचे आयोजन.

*तहसीलदार संजय बिराजदार यांच्या उपस्थितीत वरखेड येथील महालक्ष्मी देवस्थान यात्रेचे आयोजन.*

 

वरखेड प्रतिनिधी( सुरेश घुंगासे):- नेवासा तालुक्यातील श्री. महालक्ष्मी देवस्थान वरखेड येथील यात्रेनिमित्त तहसील कार्यालय येथे बैठक संपन्न झाली.वरखेड येथील यात्रा एप्रिल महिन्यांमध्ये असुन वरखेड ची आई नवसाला पावणारी असून चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी महाराष्ट्रातून येत असतात.

यानिमित्ताने तहसील कार्यालय येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे नियोजन करण्यात आले होते .त्यानुसार यात्रा काळात पोलीस बंदोबस्त १८ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेपासून मंदिर परीसरात वाहने जाऊ दिले जाणार नाहीत .कारण अरुंद रस्ते संपुर्ण गावात भाविक भक्त यांची मोठी गर्दी होत असते .त्यामुळे वाहने यात्रेनिमित्त बाहेर पार्किंग करावीत पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी बैठकीत सांगितले .आरोग्य सेवक पाणी टंचाई व चोऱ्यामाऱ्या यात्रेमध्ये कुठले अनुचित प्रकार घडू नये .व यात्रा शांततापूर्ण पार पडावी यासाठी तालुका तहसील कार्यालय येथे ग्रामस्थ व सरपंच विनोद ठोकणे , उपसरपंच विलास उंदरे ,ग्रामविकास अधिकारी अप्पासाहेब डेंगळे , तलाठी खरपुडे भाऊसाहेब व गीते भाऊसाहेब तहसीलदार डॉ. संजय बिराजदार , पंचायत समिती ओ. लखवाल , पोलीस निरीक्षक धनंजय जाधव साहेब व प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे नियोजन करण्यात आले. येत्या 16, 17, 18 एप्रिल पासून यात्रा मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते लाखो भावी आपले स्वतःचे वाहने या परिसरात घेऊन येतात व मोठी गर्दी वाहनाची दिसून येते त्यानुसार सर्व परिसरामध्ये सुरक्षा कशाप्रकारे केली जाईल यानुसार या परिसराचे पाहणी करून या परिसरामध्ये ठिकठिकाणी भाविक भक्तांना थांबण्याचे ठिकाण निश्चित करण्यासाठी काही दिवसात सर्वाधिकारी वरखेड या परिसराच्या दौरा करून बैठक घेतील .अण्णाभाऊ साठे स्मारक समिती अध्यक्ष नामदेवराव चांदणे व उपाध्यक्ष दिलीप सोळशे यांनीही बैठकीमध्ये मनोगत व्यक्त केले. की वरखेड परिसरातील व नेवासा वरखेड हा रस्ता गेल्या तीन वर्षापासून पासून या रस्त्याचे आंदोलनही केले होते. परंतु या रस्त्याचे कुठलेही काम झालेले दिसत नाहीये त्यामुळे भाविक भक्तांच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात .या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी त्यांनी त्या बैठकीमध्ये म्हणणे मांडले आहेत. व फिरते शौचालय आरोग्यसेवा व भाविक भक्तामध्ये होणारे लुटमार या सर्व गोष्टीवर विचारपूर्वक लक्ष केंद्रित करावे असे आवाहन केले.

यावेळी देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे ,सचिव कडुबाळ गोरे ,भगवान जगधने ,सुरेश शिरसाठ, यांनी सांगितले की यात्रा काळात यात्रा संपल्यानंतर साफसफाई करण्यासाठी शासनाने साफसफाईसाठी मदत करावी .कहार समाज पिढ्यान पिढया रितीरिवाजानुसार यात्रा काळामध्ये तीन दिवस पायी चालून पालखीची सेवा करत आहेत . या यात्रा काळामध्ये पालखी पैठण ते वरखेड पायी आणत असताना ठिक ठिकाणापर्यंत पोलीस बंदोबस्त मिळावा. समाजातील समाजसेवक यांना पैठण पासून ते वरखेड देवी मंदिरापर्यंत तीन दिवस पोलीस बंदोबस्त सह या पालखी सेवा करणाऱ्या सर्व भावी भक्तांची ठिकठिकाणी मदत करावी.

कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक.सचिव सुरेश घुंगासे 

कहार कर्मचारी सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष पंडुरे ,

कहार समाज पंचकमीटी पैठण अध्यक्ष बजरंग लिंबोरे तात्या , विद्युत मंडळ चे काळे साहेब यात्रे काळात लाईट व्यवस्थित रित्या नियोजन करून चालू ठेवणार आहेत .एस टी महामंडळ बसेस सुरू ठेवणार आहेत नेवासा महामंडळ आगार आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांकडे सहाय्यक सुनील मोरे सामाजिक कार्यकर्ते राजु अढागळे ,संजय जगधने संजय भगत अरुण ताकवले आदी मान्यवर उपस्थित होते.