फा. हर्मन बाखर यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमीत्त स्नेहसदन चर्च राहुरी येथे वृक्षरोपन कार्यक्रम ..
राहुरी दि.२५/९/२०२२ स्नेहसदन चर्च राहुरी येथे प्रमुख धर्मगुरू फा.मायकल राजा व सहाय्यक धर्मगुरु फा.मँथ्यू परुवाणी यांनी फा.हर्मन बाखर यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.फा.बाखर यांच्या प्रतिमेला अँङ. प्रकाश संसारे यांनी पुष्पहार घालून व फित कापून उदघाटन केले.श्रीमती पवार यांनी ख्रिस्ती धर्मात अंजीराच्या झाङाचे अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे अंजीराचे झाड लावून वृक्षारोपण कार्यक्रमास शुभारंभ केले या प्रसंगी अँङ. प्रकाश संसारे यांनी फा बाखर यांच्या कार्याबाबत सविस्तर विवेचन केले त्यांचे कार्य हे पाणलोट क्षेत्रांत ऊल्लेखनीय होतेच परंतु जिरायती भागाचा विकास करणे हेच फा.बाखर यांचा मुख्य ऊद्देश होता व हे कार्य त्यानी अंत्यत तळमळीने केले त्यामुळे त्यांना पाणलोट क्षेत्राचे पितामह म्हनुण ओळखले जात होते फा.बाखर यांना जर्मन सरकारने" ऑर्डर ऑफ मिरिट " ह्या सन्मानाच्या पदविने गौरविण्यात आले होते तसेच महाराष्ट्र सरकारने फा.बाखर यांना " कृषी भूषण पुरस्कार " देऊन गौरविले आहे . असे अनेक छोटे मोठे पुरस्कार देऊन फा.बाखर यांना गौरविन्यात आले आहे श्री रत्नाकर दोंदे यांनी फा.बाखरचे कार्य हे श्रीरामपूर येथून सुरु झाले दुष्काळी भागात पाझर तलाव विहीर खोदाई चे कामे प्रथम करण्यात आले व सर्व कामे चालु असतानाच त्याच वेळेस " सोशल सेंटरची " स्थापना झाली नंतर सोशल सेंटर चे कार्यालय अहमदनगर येथे स्थापन करण्यात आले होते अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँके मार्फंत शेतकऱ्यांना सहकारी तत्वावर " लिफ्ट इरीगेशन स्कीम " द्वारे मदत करून संगमनेर, अकोले, राहुरी शेवगाव ई. तालुक्यातील शेतकरी बांधवाना जिरायत शेती बागायत कारण्यासाठी फा.बाखर ने मदत केली पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम पाणी आडवा पाणी जिरवा योजनेअंतर्गत डोंगर माथा ते ङोंगर पायथा या कामे ग्रामस्थां च्या मार्फत केले यामध्ये इंङोजर्मन वाँटरशेड डेव्हलपमेंट व नाबार्ड बँके मार्फत संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये व देशामध्ये पाणलोट क्षेत्राचे कार्य पार पाङले आहे तसेच फा.बाखर हे "स्वामीनाथन कमिशन समीती" चे ते सदस्य होते अशाच कार्यामुळे फा.बाखर यांच्या कामाचा आलेख असाच वाढत वाढत गेला त्यामुळे त्यांच्या या कार्यांस फा.बाखर यांना स्नेहसदन चर्च राहुरी पँरीशतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पंण करण्यात आली आहे कार्यक्रमाचे सुञसंचालन जेस्ट शिक्षिका सौ.ख्रिस्तीना बोर्डे मॅडम यांनी केले व श्री.अमृत साळवे यांनी फा.मायकल राजा व फा.मँथ्यू परुवाणी यांचे आभार मानुण कार्यक्रम समाप्त झाला असे जाहीर केले*