दुसरी चांगली दिसताच पहिली सोडली अन् दुसरी पळवली खेडले परमानंद येथील घटना.

दुसरी चांगली दिसताच पहिली सोडली अन्  दुसरी पळवली खेडले परमानंद येथील घटना.

        

नगर जिल्हा प्रतिनिधी  संभाजी शिंदे

दुसरी चांगली दिसताच पहिली सोडली व दुसरी पळविली खेडले परमानंद येथील मोटरसायकल चोराची कमाल.                               

                         नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथे मोटरसायकल चोरीची घटना घडली असून येथे मोटर सायकल चोरानी कमालच केली आहे त्याने पहिली मोटार सायकल चक्क पोलीसाची पळविली त्यावर पोलीस नाव असल्याने व तिच्यापेक्षा चांगली मोटरसायकल मिळाल्याने त्याने पहिली पळविलेली मोटरसायकल तिथे सोडून दुसरी चांगली मोटरसायकल पळविली याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की सोनई पोलीस ठाण्यात आकाश बाबासाहेब तागड वय स 26 वर्ष राहणार खेडले परमानंद यांनी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे त्यानुसार दिनांक 6 रोजी सकाळी 11:30 दरम्यान खेडले कडे जाणाऱ्या रोड लगत डाव्या बाजूला असलेल्या महादेव मंदिर समोर खेडले परमानंद शिवार येथून एक लााख चाळीस हजार रुपये किमतीची बजाज पल्सर कंपनीची काळया रंगाची मोटार सायकल आज्ञा चोरट्याने चोरली या फिर्यादीनुसार सनई पोलीस ठाण्यात गुन्हा र न 25/2024 भा द वी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत चर्चा अशी माहिती समजते की यातील निर्यादीची वरील वर्णनाची व किमतीची बजाज कंपनीची पल्सर 150cc सदर भामट्याकडे असलेली पल्सर 125cc त्याने घटनास्थळी सोडून दिली व फिर्यादी तागड यांची 150 सीसी असलेली अगदी नवी कोरी मोटरसायकल चोरून नेली संबंधित भामट्याने घटनास्थळी सोडलेल्या गाडीवर पोलिस असे लिहिलेले असून सदरची गाडी पोलिसाचीच चोरलेली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे मोटारसायकल चोऱ्या बरोबर शेळ्या घोड्यावरील मोटारी पाईपलाईनचे वाल्स व फिटिंग विहिरीवरील पॅनल बोर्ड मध्ये स्टार्टर व ऑटोची चोरी अशा विविध घटना राजे रसपणे घडत असून याबद्दल काही उपाययोजना होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने पोलीस प्रशासनाला विचारण्यात येत आहे खेडले परमानंद परिसरात भुरट्या चोरांच वास्तव्य दिवसेंदिवस वाढत असून संबंधित चोराबद्दल ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिलेली असून लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात येते.