नेवासा तालुक्यातील या पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांने केला साडेसतरा लाखाचा गफला. ठेवीदार हैराण, पहा सविस्तर वृत्तान्त.

नेवासा तालुक्यातील या पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांने केला साडेसतरा लाखाचा गफला. ठेवीदार हैराण, पहा सविस्तर वृत्तान्त.

(प्रतिनिधी)संभाजी शिंदे खेडले परमानंद नेवासा

ठेवीदारांना मध्ये खळबळ उडवणारी घटना. नेवासा येथील लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेमध्ये एका कर्मचाऱ्यांनेच चक्क साडे सतरा लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आल्यामुळे नेवासा शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात पतसंस्थेच्या एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने तालुक्यात पतसंस्था कर्मचाऱ्यांत चर्चेला मोठे उधाण आले आहे.

  याबाबत स्व.मारुतराव घुले पाटील बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे मॅनेजर अंकुश धनक यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिली असून या फिर्यादीत म्हटले आहे की,घुले पाटील सहकारी पतसंस्थेमधील कर्मचारी दत्ता नरसू लष्करे हा गेल्या काही दिवसांपासून पतसंस्थेचे दैनिक अल्प - बचत खाते व कॅशियरचे कामकाज बघत असतांना त्यांने १ मे २०२१ ते ९ फेब्रुवारी २०२२ दरम्यानच्या काळात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून दैनिक अल्पबचत ठेवीदारांचे ६ लाख ६५ हजार ३४ रूपये व १० लाख ८५ हजार ८१८ रूपये असा १७ लाख ५० हजार ८५२ रूपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत मॅनेजर धनक यांनी म्हटले आहे.

 नेवासा पोलिसांनी दत्ता लष्करे विरूद्ध ४२० सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे पतसंस्था क्षेञात मोठी खळबळ उडालेली असून ठेवीदारांचे पैसे जमा करतांना बँकपास बुकही या कर्मचाऱ्यांने ठेवून ठेवीदाराकडून जमा केलेली रक्कम घेवून त्यांच्या खात्यात जमा केली नसल्यामुळे हा अर्थिक घोटाळा उघड झाला आहे या घोटाळ्यामुळे खातेदारांचे चांगलेच धाबे दणानले आहेत.

या पतसंस्थेत कर्मचाऱ्यानेच चक्क साडेसत्तरा लाख रुपयांचा अपहार केल्यामुळे ठेवीदारांत प्रचंड खळबळ उडाली असून कर्मचाऱ्याने ठेवीदाराचे पैसे बँकेत जमा न करता अपहार केल्यामुळे नावाजलेल्या पतसंस्थेत ठेवी ठेवलेल्या खातेदारांना चांगलीच धडकी भरली आहे.

           तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.