*माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमास सर्वच पक्षाच्या नेते मंडळीसह सर्व सामान्य कार्यकर्त्यांची मांदियाळी*
आज राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या वतीने दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन बु-हाणनगर येथील निवासस्थानी करण्यात आले होते. गेल्या पंचवीस वर्षांपासून कर्डिले साहेब हे दरवर्षी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करतात तसेच यावर्षी ही आज फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.आजच्या कार्यक्रमास अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे नेते पदाधिकारी तसेच राहुरी विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, खासदार सुजय दादा विखे पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्रजी भोसले साहेब, माजी मंत्री राम शिंदे साहेब, आमदार संग्राम भैय्या जगताप, आमदार अरुण काका जगताप, माजी आमदार राहुल दादा जगताप, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंगजी अभंग, माजी आमदार भानुदासजी मुरकुटे, माजी आमदार अण्णासाहेब माने पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन व सर्व सन्माननीय संचालक, नगर शहराचे महापौर संजयजी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, उद्योजक राजेंद्र चोपडा, उद्योजक चंद्रकांत भाऊ गाडे, उद्योजक वाकडे पाहुणे, उद्योजक सचिन शेठ कोतकर, जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुणजी मुंडे, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, रावसाहेब चाचा तनपुरे, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीताई थोरात, उद्योजक करीम शेठ हुंडेकरी, माजी उपमहापौर हाजी नजीर भाई शेख, युवा नेते सुरेंद्र गांधी, डॉक्टर दीपक सर, डॉक्टर सोनवणे सर, उद्योजक विजयरावजी गडाख, अहमदनगर महानगरपालिकेचे विविध पक्षाचे नगरसेवक नगरसेवक, उद्योजक पैलवान अफजल शेख, असलम शेख, कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर चे सर्व आजी माजी सभापती उपसभापती व संचालक, खरेदी विक्री संघाचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक तसेच अहमदनगर जिल्ह्यातून आलेले सर्वच सन्माननीय आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब म्हणाले की मी गेली 25 वर्षापासून राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे सर्वसामान्य जनतेने मला आमदार,राज्याचा मंत्री, जिल्हा बँकेत चेअरमन व संचालक पदापर्यंत पोहोचवले जनतेच्या प्रेमापोटीच हे सर्व शक्य झालं माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्यास जनतेने पंचवीस वर्षे आमदार ठेवले हेच मी माझे भाग्य समजतो. मी गेली 25 वर्षापासून दरवेळेस दिवाळीत फळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो आज ही फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या वेळेस फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असताना मी माजी आमदार असताना देखील एवढ्या मोठ्या संख्येने नगर जिल्ह्यातून सर्वच नेते मंडळी,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. विशेष म्हणजे यावेळेस खूपच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गेली पंचवीस वर्षापासून मी हा कार्यक्रम करत आहे परंतु आज जेवढी मोठी संख्या कार्यकर्त्यांची होती तेवढी संख्या यापूर्वी कधीही या कार्यक्रमास झाली नव्हती मी आमदार नसताना देखील एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वच कार्यकर्त्यांचे व नेते मंडळींचे मनापासून आभार मानतो आणि असेच प्रेम यापुढेही आपण सर्व माझ्यावर करतील याची अपेक्षा करतो असे कर्डिले साहेब म्हणाले.