ख्रिस्ती ऐक्य सप्ताह निमित्त टिळकनगर येथील कॅथोलिक चर्च मध्ये प्रार्थना संपन्न झाली.
टिळकनगर- दि. २४ जानेवारी २०२४, संपूर्ण जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी ,उपासक व विविध ख्रिस्ती पंथीय विविध मंडळी ख्रिस्त सुवार्ता पसरविण्याचे काम करत आहेत. या सर्वामध्ये ऐक्य घडून यावे व आपआपसात स्पर्धा न करता प्रेम व सहकार्य निर्माण व्हावे. तसेच सर्वांनी एकत्र येवून प्रार्थना करावी. यासाठी जागतिक पातळीवर ' ख्रिस्ती ऐक्य सप्ताह ' साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर परिसरातील विविध चर्चचे धर्मगुरू ,पास्टर्स धर्मभगिनी व भाविक एकत्र येवून प्रार्थना करतात. या 'ख्रिस्ती ऐक्य सप्ताह ' निमित्त टिळकनगर येथे कॅथोलिक चर्च मध्ये दि. २४ जाने. २०२४ रोजी प्रार्थना आयोजित करण्यात आली होती .
प्रथमतः टिळकनगर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह.फा. मायकल वाघमारे यांनी आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत केले . लोयोला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फा ज्यो. गायकवाड यांनी प्रास्ताविक करुन शेवटी सर्वांना आशीर्वाद दिला.' ख्रिस्ती ऐक्य सप्ताह 'यावर दिव्यवाणी चर्च धर्मगुरु रेव्ह. फा.अनिल चक्रनारायण यांनी उत्कृष्ट माहिती सांगितली.बेथेल चर्चचे पास्टर सतिश आल्हाट यांनी सर्वांसाठी प्रार्थना केली. शेवटी उपस्थित सर्व धर्मगुरू पास्टर्स , धर्मभगिनी व भाविक यांचा गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला व आभार मानण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना अल्पोपहार व चहापाणी देण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेव्ह.फा. मायकल वाघमारे, रेव्ह,फा. संजय पठारे आनंद विहारच्या सिस्टर्स तसेच पॅरिश कौन्सिलचे पदाधिकारी राजेंद्र भोसले सर, राजन पवार , संजय कोळगे ,संदिप त्रिभुवन , पी.एस. निकम सर , सतिश पाटोळे ,संतोषराव कोळगे , बी.के.त्रिभुवन , महेश ब्राम्हणे ,मारिया माघाडे , मारिया तेलोरे यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ठ केल्याबद्दल उपस्थितांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.