राहुरी कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभागाच्या प्रत्येक कामात घोटाळा .
राहुरी कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभागाच्या प्रत्येक कामात घोटाळा .
प्रतीनिधी :आर आर जाधव
राहुरी कृषी विद्यापीठाचे बांधकाम विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहे . या बाधकाम विभागात मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असतात या बांधकाम विभागाचे अनेक कारणामे अनेक वृत्त पत्रात छापून आले आहेत .अनेक सामाजीक कार्यकर्त्यानी तक्रारी करूनही हे बांधकाम विभाग आपल्या हरकती पासुन दुर झालेले नाही .
बांधकामामध्ये असलेले घोटाळे उघडकीस येत असतानान इलेक्ट्रीक कामातही बांधकाम शाखेने घेटाळेबाजी सोडलेली दिसत नाही विद्यापीठात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकच्या दुरुस्तीची कामे दाखऊन लाखो रुपयांची बिले मंजुर केल्याची बाब माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहीती वरून उघड झाली आहे . सायंरिस्ट होस्टेल चे वातानुकूलित उपकरणाच्या दुरुस्त्या इतर कार्यालयातील इलेकट्रीक कामा च्या दुरुस्त्या इत्यादी बाबी ही बिले मंजुर केलेली दिसुन येत आहेत . ( मंजुर बिलाची कामे खरोखर केली आहेत का ? ही बिले कोणाच्या लाभात मंजुर केली जातात याची शंका येते . )
विद्यापीठ बाधकाम शाखेने इलेक्ट्रीकच्या कामावर मोठ्या प्रमाणात खर्च केला मग विद्यापीठ कॅम्पस परिसरात विद्युत प्रवाह चालु असलेल्या तारा अक्षरशः जमीनीवर लोळत पडलेल्या दिसुन येतात . या जमीनीवर पडलेल्या तारां मधुन विद्युत प्रवाह चालु असलेने तेथे वावरणारे मजुर कामगार यांचे जिवीतास धोका निर्माण झालेला आहे . या ठिकाणी जिवीत हाणी झाल्यास त्यास जबाबदार कोण ? अशी परिस्थिति विद्यापीठ कँपस परिसरात आहे तर विद्यापीठ बाधकाम शाखेने इलेक्ट्रीक कामाच्या दुरुस्तीची लाखो रुपयांची बिले कशी काढली आसा प्रश्न उपस्थित होत आहे .