बालाजी देडगाव येथे दिवाळी निमीत्त आनंद शिधा किटचे वाटप
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे आज स्वस्त धान्य दुकान येथे दीपावली निमित्त आनंद शिधा किटचे वाटप करण्यात आले.
राज्य सरकारच्या माध्यमातुन कूपन धारकांना" आनंदाचा शिधा"या किटचे वाटपाचा कार्यक्रम विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. हा कार्यक्रम देडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या हॉलच्या समोर पार पडला.
यावेळी माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, विद्यमान चेअरमन महेश कदम, व्हॉईस चेरमण रामा कोकरे, कचरू तांबे, बालाजी देवस्थान ट्रस्ट विश्वस्त सुभाष मुंगसे, बालाजी पाणी वाटप संस्था चेअरमन संतोष तांबे, माजी चेअरमन योसेफ हिवाळे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, संचालक संदिप कुटे, पोपट मुंगसे,संचालक अरुण मुंगसे, किशोर वांढेकर, नवनाथ तिडके, जालिंदर तांबे, संपत ससाने, डा
नियल दळवी, शंकर नांगरे, सोसायेटी चे सचिव रामा तांबे, गणेश सुसे, सेल्समन गोरख देवकाते, शालुमन हिवाळे, व महिला भिमबाई कदम, आशाबी पठाण, बनसोडे आजी, आदी देडगावचे ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थानी या योजनेचे स्वागत केले.