नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांना आज गोंदिया पालकमंत्री पदाचे अधिकृत पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त

नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांना आज गोंदिया पालकमंत्री पदाचे अधिकृत पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त

राहुरी दिनांक 22 

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आज मंगळवारी अधिकृत रित्या निवड करण्यात आली गेल्या दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंबंधीची घोषणा केली होती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची असलेल्या अधिकृत पत्रावर स्वाक्षरी केली सदरील वृत्त राहुरी धडकताच राज्यमंत्री तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत असताना मंत्री तनपुरे यांच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी देण्यात आल्याचे समजताच राहुरी शहरात जल्लोषाला अधिकच उधाण आले नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष नंतर आमदार राज्यमंत्री आता थेट पालकमंत्री पदापर्यंत मंत्री तनपुरे पोहोचल्याने समर्थकांमध्ये उत्साह संचारला तर विरोधी गटात सन्नाटा पसरला राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती व शनी मंदिर चौक यासह शहरात विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली मंत्री तनपुरे यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे