जिवनात यशस्वी होण्यासाठी नेतृत्व विकासाबरोबर संघटनात्मक कौशल्य आत्मसात करणे गरजेचे म.फु.कृ.विद्यापीठ अधिष्ठाता -डॉ प्रमोद रसाळ.

जिवनात यशस्वी होण्यासाठी नेतृत्व विकासाबरोबर संघटनात्मक कौशल्य आत्मसात करणे गरजेचे म.फु.कृ.विद्यापीठ अधिष्ठाता -डॉ प्रमोद रसाळ.

*जीवनात यशस्वी होण्यासाठी नेतृत्व विकासाबरोबर संघटनात्मक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे*

*- अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ*

*राहुरी विद्यापीठ, दि. 21 मार्च, 2022*

 प्रत्येकाने स्वतः मधील नेतृत्व गुणांच्या वाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला जीवनात अनुयायी व्हायचे की नेता व्हायचे हे प्रत्येकाने ठरवून तसा प्रयत्न करायला हवा. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने नेतृत्व विकासाबरोबरच संघटनात्मक कामासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करण्याची गरज असल्याचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले

 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विस्तार व संज्ञापन विभाग व आनंद गुजरात येथील विस्तार शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ शास्त्रज्ञांसाठी नेतृत्वगुणांचा विकास व संघटनात्मक कार्यासाठीची कौशल्ये या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. प्रमोद रसाळ बोलत होते. याप्रसंगी कृषि विस्तार व संज्ञापन विभाग प्रमुख डॉ. मिलिंद अहिरे, माजी कृषि विस्तार विभाग प्रमुख डॉ. सुभाषचंद्र शिंदे, आनंद, गुजरात येथील विस्तार शिक्षण संस्थेचे डॉ. केयुर गरधारीया, श्री. ए.पी. नीनामा, श्री. व्ही.जे. पटेल व डॉ. जी.के. ससाणे उपस्थित होते. 

 डॉ. रसाळ पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करुन अभ्यास केल्यास परिक्षेत येणारा ताण कमी होऊ शकतो. सध्या ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांवर परिक्षेचा अनावश्यक ताण आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येकाच्या जीवनात अनेक अडचणी येतात अशा वेळी योग्य लिडरच्या सहाकार्यातून आपण चांगले काम करु शकतो. सेमीनारमध्ये स्टेजवरील धिटाई येण्यासाठी, ताण विरहीत काम पुर्ण क्षमतेने करण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनासुध्दा होईल असे यावेळी ते म्हणाले. डॉ. मिलिंद अहिरे आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हणाले की विद्यापीठात कर्मचारी संख्या पुरेशी नाही. कमी मनुष्यबळामध्ये चांगले काम करणे ही गरज आहे. अशावेळी लिडरचा उपयोग होतो. हे प्रशिक्षण शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही त्यांचे ज्ञान वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यावेळी डॉ. केयुर गरधारीया यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. जी.के. ससाणे यांनी मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांबरोबर विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला आहे.