उंबरे येथील आरोपीस तीन उल्पवयीन मुलींशी अश्लील कृत्य करण्याच्या कारणांवरून ४ वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रू. दंडाची शिक्षा.

उंबरे येथील आरोपीस तीन उल्पवयीन मुलींशी अश्लील कृत्य करण्याच्या कारणांवरून ४ वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रू. दंडाची शिक्षा.

चाईल्ड लाईन संस्थेचा कर्मचारी असंल्याची बतावणी करुन तीन अल्पवयीन मुलींना पळवून त्यांचेशी अश्लील कृत्य करणा-या आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा"

अहमदनगर : मु.पो.उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर येथे राहणा-या आरोपी नामे सोमनाथ उर्फ ऋषीकेश एकनाथ हापसे वय ३२ वर्ष याने चाईल्ड लाईन संस्थेचा कर्मचारी असल्याची बतावणी करुन तीन अल्पवयीन मुलींना पळवून त्यांचेशी अश्लील कृत्य केल्या प्रकरणी मा. विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माथुरी एच. मोरे यांनी आरोपीस बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ८ तसेच भा. द. वि. कलम ३६३,३६६, ३५४ अन्वये अन्वये दोषी धरून आरोपीस बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ८ नुसार चार वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, रक्कम रुपये तीन हजार दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच भा. द. वि. कलम ३६६ नुसार ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रु.३०००/-, दंड न भरल्यास एक महिना साथी कैद अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील श्रीमती मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले.

सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी की,

दिनांक १३.०९.२०२३ रोजी फिर्यादी हिने तिची अल्पवयीन लहान बहीण तसेच बहिणीच्या दोन अल्पवयीन मैत्रिणी या शाळेत जातो म्हणुन घरातुन बाहेर गेल्या त्या परत आल्या नाहीत म्हणुन तोफखाना पो.स्टे. ला अज्ञात इसमा विरुध्द अल्पवयीन मुलींना पळवून नेल्या प्रकरणी फिर्याद दिली. याबाबत तोफखाना पो.स्टे.ला भा.दं.वि. कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर ६ टिनेचा तपास महिला पी.एस.आय. पुनम श्रीवास्तव यांचेकडे सोपवण्यात आला. तपास चालु असताना तोफखाना पोलिसांना सदर तीनही अल्पवयीन पिडीत मुली या हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार तोफखाना पोलिसांनी हैद्राबाद येथे जाऊन तीनही अल्पवयीन पिडीत मुली ताब्यात घेऊन तोफखाना पो.स्टे.ला घेऊन आले. तीनही अल्पवयीन पिडीत मुलींचा तोफखाना पोलिसांनी जबाब नोंदविला असताना त्यांनी सांगितले की, " दि.१२/०९/२०२३ रोजी तीनही अल्पवयीन पिडीत मुली या शाळेत जातो म्हणुन घरातुन बाहेर पडल्या त्यानंतर त्या फिरण्यासाठी सिध्दबाग येथे थांबल्या. सिध्दीबाग येथुन या तिनही पिडीत मुली त्यांचे इतर मित्रां समवेत डोंगरगण येथे फिरावयास गेल्या. तेथे धबधबा पाहुन फिरुन संध्याकाळच्या सुमारास पिडीत मुलींच्या मित्रांनी पिडीत मुलींना पुन्हा सिध्दीबाग येथे सोडले. सिध्दीबाग येथे परतल्यानंतर मुलींची घरी जाण्याची इच्छा नसल्याने त्या सिध्दीबाग बाहेरील रस्त्यावर फिरत असताना अप्पु हत्ती चौक याठिकाणी आरोपी सोमनाथ उर्फ ऋषीकेश एकनाथ हापसे हा त्याची टोयोटा कंपनीची गाडी घेऊन त्यांचे जवळ आला व त्यांना म्हणाला की, तुम्ही कोण आहात एवढ्या उशिरा काय करत आहात पोलिसांना फोन लावु का ? त्यावर पिडीत मुलींनी आरोपीस तुम्ही कोण आहात असे विचारले असता त्याने मी चाईल्ड लाईनचे काम करतो मी तुम्हाला मदत करतो असे म्हणून त्याचे गाडीत बसायला सांगितले तसेच त्याचे नाव ऋषीकेश असल्याचे सांगितले. त्यानंतर पिडीत मुली या त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याचे गाडीत बसल्या त्याने पिडीत मुलींना रात्री बारा चे सुमारास तो राहत असलेल्या त्याचे रुम वर घेऊन गेला. पिडीत मुली या आरोपी सोबत रात्रभर त्या रुम वर राहिल्या. त्यावेळी आरोपीने दोन मुलीशी अश्लिल वर्तन केले तसेच एका मुलीसोबत तिचे इच्छे विरुध्द शाररिक संबंध केले. दुस-या दिवशी तिनही पिडीत मुली यांनी आंम्हाला हैद्राबाद ला नातेवाईकांकडे जायचे असल्याचे सांगितल्याने आरोपीने त्यांना रेल्वे स्टेशन अहमदनगर येथे त्याचे गाडीतुन आणून सोडले. त्यानंतर तीनही मुली रेल्वेने पुणे रेल्वे स्टेशन येथे गेल्या तेथुन हैद्राबाद ला गेल्या. तेथे एका पिडीत मुलीच्या ओळखीच्या व्यक्तीचे बॉबी लॉज होते त्या ठिकाणी पोहचल्या. अल्पवयीन पिडीत मुली लॉजवर आल्या असल्याचे समजल्यावर लॉज मालकाने हैद्राबाद पोलिसांना मुली त्यांचे कडे असल्याची माहिती कळवली त्यानंतर हैद्राबाद पोलिसांनी तीनही पिडीत मुलींना लॉजवर जाउन ताब्यात घेतले व मुलींची माहिती तोफखाना पोलिसांना कळवली. माहिती समजल्यानंतर तोफखाना पोलिस हैद्राबाद येथे जाऊन पिडीत मुलींना ताब्यात घेऊन अ.नगर येथे पो. स्टे. ला घेऊन आले"अशा पध्दतीने पिडीत मुलींचा जबाब नोंदविल्यानंतर पोलिसांनी पिडीत मुलींची मेडीकल करुन घेतली. त्यानंतर पिडीत मुलींनी दिलेल्या वर्णना नुसार तोफखाना पोलिसांनी आरोपीस अटक केली व पिडीत मुलींच्या जबाबा वरुन आरोपी विरुध्द भा.द.वि. कलम ३६६,३७६ (३), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ४,६ नुसार कलम वाढवण्यात आले. सदर घटनेचा संपूर्ण तपास पोलिस उपनिरिक्षक पुनम श्रीवास्तव यांनी करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण ११ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, अल्पवयीन पिडीत मुली, पंच साक्षीदार, मुख्याध्यापक, वैदयकिय अधिकारी, तपासी अधिकारी, तसेच वया संदर्भात अहमदनगर महानगरपालिकेचे माहितगार इसम यांची साक्ष नोंदविण्यात आली. सदर केस मध्ये तीन पिडीत मुली पैकी एक पिडीत मुलगी उलट तपासणी मध्ये फितुर झालेली होती.

सरकार पक्षाचा संपूर्ण पुरावा ऐकल्यानंतर मा. न्यायालयाने आरोपी विरुध्द बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ८ नुसार चार्ज वाढविला. या केसची सुनावणी चालु असताना सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की, सर्व तीनही पिडीत मुली या सोळा वर्षा खालील आहे तसेच आरोपीने तो चाईल्ड लाईन संस्थेचा कर्मचारी असल्याचे खोटी बतावणी करुन पिडीत मुलींचा विश्वास संपादन केला तसेच आरोपी याने यापूर्वी देखील खोटे बनावट नाव धारण करुन फसवणुकीचा गुन्हा केलेला होता त्या केसची सुनावणी होऊन आरोपीस दोषी धरुन त्यास शिक्षा झालेली आहे. त्यामुळे आरोपीला जर या केसमध्ये निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पिडीत मुली या वय वर्षे १६ च्या आतील असलेल्या अज्ञान मुली हया आरोपी विरूध्द काहीही कारण नसताना खोटे का सांगतील? त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राहय धरून मा. न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील श्रीमती मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म.पो.कॉ. अडसुळ, तसेच पो.हे.कॉ. मुश्ताक शेख, ए.एस.आय. नितीन गायकवाड यांनी सहकार्य केले.