जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळालेले पद न घेता पुन्हा जोमाने अभ्यास करून यशाचे शिखर गाठले. खेडले परमानंद येथील रणरागिणी अक्षदा राजेंद्र आघाव हिची यशोगाथा .
प्रतिनिधी खेडले परमानंद , नेवासा
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळालेले पद न घेता पुन्हा जोमाने अभ्यास करून यशाचे शिखर गाठले.
खेडले परमानंद येथील रणरागिणी अक्षदा राजेंद्र आघाव हिची यशोगाथा .
प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपणाला हवे ते पद मिळेपर्यंत जिद्द आणि चिकाटीची पराकाष्ठा करणाऱ्या रणरागिनीची ही सत्य कथा आहे .नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील अक्षदा एमपीएससीची परीक्षा देऊन पीएसआय झाली .नाशिकला ट्रेनिंग चालू असताना शेवटचे दोन महिने राहिले परंतु ही नोकरी तिला आवडत नव्हती म्हणून तिने ही नोकरी सोडली .
तुला जे योग्य वाटते ते कर असा घरच्यांचा सल्ला असल्याने तिने पुन्हा अभ्यास चालू केला .तिचे पती अभिजीतराव दिल्लीला होते .पती बरोबर राहून अक्षदान सन 2022 ला पुन्हा पीएसआय झाली . तीला हे पद स्वीकारण नाही व पून्हा जोमाने अभ्यास करून परिक्षा देणे सुरु ठेवले .
मिळालेली नोकरी सोडणे व अभ्यास सुरु ठेवणे यामुळे अनेक जण तिला अभ्यास न करण्याचा सल्ला देऊ लागले . पण तिने जिद्द सोडली नाही . मागच्या आठवड्यात तिने दिलेल्या परिक्षेचा निकाल लागला आणि तिला हवी असलेली राज्य विक्री कर निरिक्षक ही नोकरी तिने मिळवली . हे ऐकुन सगळ्या कुटुंबाला खूप आनंद झाला .
या सगळ्या प्रवासात तिचे पती अभिजीतरावांची खूप साथ मिळाली . त्यांनी दाखवलेल्या विश्वसा शिवाय हे अशक्य होते असे अक्षदाने सांगितले आहे .