सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगाचे सादरीकरण करत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात केला साजरा .
प्रयोगाचे सादरीकरण करत, विद्यार्थ्यांनी केला उत्साहात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
राहुरी: सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यालयातील इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगाचे सादरीकरण केले यामध्ये मॅजिक वॉटर टॅप ,इलेक्ट्रिक बेल, व्हिस्कॉसिटी, न्यूटन क्रेडल ,न्यूटन डिस्क , फ्लोटिंग फॅन असे अनेक प्रयोग विद्यालयाचे विद्यार्थी ईश्वरी तोडमल,उत्कर्ष घोडके , सई शिंदे,तेजस अभंग , रोहीत अवारे, पार्थ कराळे,कल्याणी कोहकडे यांनी दाखवले आणि त्यामागील कार्यकारण भाव व तत्व स्पष्ट केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यालयाचे विज्ञान शिक्षक तथा उपमुख्याध्यापक अरुण तुपविहीरे यांनी विज्ञानातील गंमती जंमती समजण्याकरता अनेक छोटे छोटे प्रयोग दाखवले , त्यातील काही जादुचे प्रयोग पाहताना विद्यार्थी अक्षरश: भारावून गेले. जादूचे प्रयोग व अंधश्रद्धा मागील विज्ञान प्रयोगातून उलगडल्यानंतर मुलांना खूप आनंद झाला.
विद्यार्थ्यांनी डोळे उघडे ठेवून,आपल्या सभोवताच्या अनेक घटनेमागील कार्यकारण भाव समजावून घेत, कल्पनाशक्ती व संशोधनवृत्ती चा उपयोग करत नाविन्यपूर्ण संशोधन केले पाहिजे असे प्रतिपादन अरुण तुपविहीरे यांनी केले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक हलीम शेख सर रवींद्र हिवाळे सर आणि अनिस सय्यद, सचिन सिन्नरकर ,तुकाराम जाधव या शिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा धनवटे यांनी या उपक्रमाबद्दल सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले,प्रास्ताविक साक्षी पाटोळे सूत्रसंचलन शामल पाटोळे व प्रीती गडदे तर आभार श्रद्धा कोतकर या विद्यार्थिनीने मांडले, कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री ,पर्यवेक्षक बाळासाहेब डोंगरे, घनश्याम सानप ,संतोष जाधव,प्रा जितेंद्र मेटकर हे उपस्थित होते.