सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण व मातृदिन समारंभ उत्साहात संपन्न.

सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण व मातृदिन समारंभ उत्साहात संपन्न.

राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथेक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण व मातृदिन समारंभ दिनांक 03/01/2023 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला . प्रथमतः विद्यापीठाचे कुलगुरू तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ . पी . जी .पाटील यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणकरण्यात आले .

 

           या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर पी . जी . पाटील हे होते .या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, डॉक्टर उमेश नागरे हे होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉक्टर प्रमोद रसाळ, डॉक्टर महानंद माने यांची होती. या उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यानंतर कुलगुरू डॉक्टर पी .जी . पाटील यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण तुपविहिरे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सुप्रसिद्ध कवी अरुण मात्रे यांचा सत्कार कुलगुरू यांनी तर डॉक्टर उमेश नागरे यांचा सत्कार विद्यालयाचे सचिव डॉक्टर महानंद माने यांनी केला .

 

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाचे प्राध्यापक जितेंद्र मेटकर यांनी उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले .यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची संख्यात्मक वाढी बरोबरच गुणात्मक वाढ झाली आहे .या शाळेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट विद्यालयाचा बहुमान मिळाला आहे .या शाळेतील विद्यार्थी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विविध क्षेत्रात चमकत आहेत .

 

      अध्यक्षीय भाषण विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी .जी .पाटील यांनी केले .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले शाळेमध्ये शिकत असताना थोर विचारवंतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यश संपादन करा .विविध उपक्रमामुळे शाळेचा लौकिक होत असल्याने आनंद झाल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले .गेल्या दोन वर्षांमध्ये शाळेच्या प्रगतीमध्ये अमुलाग्र बदल झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त करून विविध स्पर्धेमध्ये उत्तुंग यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाहि दिल्या आहे .

 

      या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर उमेश नागरे यांनी शालेय स्पर्धांमधील सहभागाचा जीवनामध्ये कसा उपयोग होतो हे सांगून उत्कृष्ट मार्गदर्शन केले .आपला जीवनपट उलगडताना मी याच शाळेत शिकलो आणि डॉक्टर झालो तरीही या शाळेची नाळ आजही माझ्याशी कायम असल्याचे भावनिक उद्गार त्यांनी काढून सावित्रीबाई फुले जयंती निमित्त या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलावल्यामुळे त्यांनी संस्थेचे मनस्वी आभार मानले .यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून असलेले सुप्रसिद्ध कवी यांनी कवितांच्या मैफिलीत उपस्थितांना व विद्यार्थ्यांना आपल्या कवितेमध्ये रंगवून वातावरण प्रसन्न केले .अनेक कविता त्यांनी विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन गाऊन दाखवल्या .

 

 

        या कार्यक्रमांमध्ये विद्यालयाचे सचिव डॉक्टर महानंद माने यांनी सांगितले की जीवन जगताना चांगला नागरिक घडणे गरजेचे आहे आणि हेच काम आमची शाळा करत असल्याचा अभिमान आम्हाला होत आहे .शाळेमध्ये घडलेला बदल ,यशस्वी विद्यार्थी,त्यांना सहकार्य करणारे शिक्षक व पालक यांचे डॉक्टर माने यांनी शब्दसुमनांनी आभार मानले.

 

      विद्यालयातील विविध उपक्रमात व स्पर्धेत सहभाग घेऊन यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले . यावेळी बक्षिसांचा स्वीकार करताना विद्यार्थी व पालकांमध्ये वेगळाच आनंद झळकत असल्याचे दिसत होते .विद्यार्थ्यांबरोबरच आदर्श विद्यार्थी प्रिय पुरस्कार शाळेतील शिक्षक रवींद्र हिवाळे व रवींद्र हरिश्चंद्रे यांना देण्यात आला तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थी प्रिय पुरस्कार शिक्षिका भाग्यश्री शेटे व शिक्षक झानेश्वर ढोकणे यांना देण्यात आला आहे.

 

 

        या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे , प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब खेत्री व इंग्रजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका योगिता आठरे सह सर्व शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टेमकर सुरेखा व शेटे भाग्यश्री यांनी केले.सर्वात शेवटी वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.