रक्षकच बनले भक्षक,स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याची तुफान हप्ते वसुली.

रक्षकच बनले भक्षक,स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याची तुफान हप्ते वसुली.

स्थानिक गुन्हे शाखेची नेवासा तालुक्यातून तुफान वसुली तर अवैध धंदे सुसाट.                     

प्रतिनिधी सोनई .

अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखा ही नगर जिल्हा पोलीस दलांची शान आहे मात्र या शाखेतील एक कर्मचाऱ्याने नेवासा तालुक्यातील सोन‌ई पोलीस ठाण्यात काही काळ काम केले असल्याने तालुक्यातील धंद्याची खडानखडा माहिती असल्याने कोणत्या धंद्यातून किती कमाई होते याची कल्पना असल्याने कोणा कडुन किती वसुली करायची हे ठरविले जाते . त्या प्रमाणे सोन‌ई येथील अवैध धंदे वाल्यांकडुन जबरदस्तीने हा कर्मचारी वसुली करत आहे . या कर्मचाऱ्याने काही काळ सोन‌ई पोलीस स्टेशन येथे काम केले असल्याने सर्व अवैध धंद्यांची माहिती असल्याने व सध्या हा कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखा येथे नेमणुकीस असल्याने सोन‌ई शनिशिंगणापूर घोडेगाव परिसराची व येथे चालणाऱ्या अवैध्य धंद्या बाबद माहिती आहे . तसेच अवैध धंद्याबाबत खडानखडा माहिती असल्याने या धंद्यातुन किती कमाई होते याचे सर्व इंगित माहिती असल्याने ह्या धंद्याया वाल्या कडुन जबरदस्तीने वसुली करत आहे . सातत्याने अवैध धंदे बंद करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीसा बरोबर स्थानिक गुन्हे शाखेची सुध्दा आहे . हे धंदे बंद करण्याची मागणी जनते मधुन केली जात असताना अशा हप्ते खाऊ कर्मचाऱ्यांमुळे हे धंदे बंद होण्या ऐवजी मोठ्या प्रमाणात वाढत आहे . जनता कीतीही बेंबीच्या देठापासून बोंबलली तरी हे धंदे बंद होणार नाहीत . सदर वादग्रस्त कर्मचाऱ्याबद्दल नागरिका मध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे . या बाबत अनेकांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे तक्रारी केल्या असताना सुध्दा वरिष्ठ अधिकारी वसुली करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे . सदर पोलीस दादांची तातडीने स्थानिक गुन्हे शाखेतुन बदली करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी योग्य निर्णय न घेतल्याने संबंधित खात्याचे मंत्री यांना भेटुन तातडीने याची अहमदनगर जिल्हा पोलिस दलातुन बदली करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे . स्थानिक गुन्हे शाखा ही जिल्हा पोलीस दलाचा डोळाच म्हणावा लागेल मात्र अशा हप्ते खोरी मुळे ही शाखा बदनाम होत चालली आहे . पोलीस दलात या शाखेत येण्यासाठी प्रचंड चढाओढ लागलेली दिसुन येते हे कशा साठी याचे इंगित कळत नाही.

 

चौकट-अहमदनगर जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणुन नविन बदलुन आलेले राकेश ओला हे खमके सिंघम पोलिस अधिकारी म्हणुन ओळखले जातात . त्यांनी या आधी जिल्ह्यात काम केले असल्याने येथील परिस्थिती बाबत त्यांना पूर्ण कल्पना आहे . राकेश ओला हे स्थानिक गुन्हे शाखेतील तेच तेच कर्मचारी बदलणार का ? तसेच नेवासा व सोनई परिसरातील अवैध धंद्यांना कसा आळा घालणार याची उत्सुकता जनतेला लागली आहे.