धुळदेव यात्रा उत्सव निमित् माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी घेतले दर्शन.

धुळदेव यात्रा उत्सव निमित् माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी घेतले दर्शन.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे दरवर्षीप्रमाणे चालत आलेला कै. पूजनीय कारभारी देवा गोयकर यांच्या कृपाशीर्वादाने या धुळदेव यात्रेचे आयोजन केले जाते.

          या यात्रेचे वैशिष्ट्य महाराष्ट्रभरातून भाविक दर्शनासाठी येतात .या देवाला केलेला नवस नक्की पूर्ण होतो असा भाविकांचा विश्वास आहे. म्हणून हा उत्साह धनगर समाजाच्या वतीने आयोजित केला जातो. या उत्साहात पारंपारिक आलेला गज ढोल, गजनृत्य या खेळाचे आयोजन केले जाते .हा अतिशय पारंपारिक असणारा खेळ यामध्ये सर्व भाविकांत गुलालाची उधळण करून आनंद घेतला जातो. हा एक देवाचा आशीर्वाद मानला जातो .मोठ्या भक्ती भावाने लोक नैवेद्य करून या यात्रेची शोभा वाढवतात. या ठिकाणी प्रसादाचे आयोजन केले जाते. भाविक मोठ्या आनंदाने प्रसादाचा लाभ

घेतात.

       या कार्यक्रम निमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी   मृदू जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख उपस्थित होते त्यांनी सर्व धनगर समाजाला शुभेच्छा देत या समाजातील लोक धार्मिक व श्रद्धाळू आहे. या शब्दात धनगर समाजाचे कौतुक केले.

         यावेळी मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष व विश्वस्त यांनी नामदार शंकरराव गडाख यांचा सन्मान करत त्यांना त्यांनाही देवस्थानच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.