जावयास आत्महत्येस प्रवृत्त केले प्रकरणी ३ महिला व ३ पुरुष यांना ५ वर्षाची सक्त मजुरी व दंडाची शिक्षा.

जावयास आत्महत्येस प्रवृत्त केले प्रकरणी ३ महिला व ३ पुरुष यांना ५ वर्षाची सक्त मजुरी व दंडाची शिक्षा.

सासरच्या छळास कंटाळून जावयास आत्महत्येस प्रवृत केले प्रकरणी ५ वर्षे ६ आरोपीस सक्त मजुरी व शिक्षा.

   प्रतिनिधी आर आर जाधव

आरोपी नामे १ )बिट्टुबाई मारूती शिनगारे २) सिमा रावसाहेब बोरुडे ३) शिवानी रोहीत लांडगे ४) छकुल्या उर्फ सतिश रावसाहेब बोरुडे ५ ) मोइन अमीर शेख ६ ) शरद राजाराम शिंदे सर्व राहाणार डिग्रस ता राहुरी जि अहमदनगर यांनी मयत रोहीत कचरू लांडगे यास वारंवार लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण व शिवीगाळ करत असत त्याच्या त्रासाला कंटाळून मयत रोहीत कचरू लांडगे याने त्याच्या राहात्या घरी छताच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती आरोपींनी वारंवार मयत रोहीत यांस त्रास देऊन आत्महत्तेस प्रवृत केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायधीश श्री एन् आर नाईकवाड साहेब यांनी अरोपींना दोषी धरून भा .द. वि . का कलम ३०६ स ह ३४ प्रमाणे पाच वर्षाची सक्त मजुरी व प्रत्येकी २००० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिण्याची साधी कैद तसेच भा दं वि कलम ३२३ व ३४ प्रमाने सहा महिने सक्त मजुरी व प्रत्येकी १००० रु दंड व दंड न भरल्यास १५ दिवसाची साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली 

या बबत सविस्तर हकिकत अशी कि

वरवंडी ता राहुरी येथील रहीवाशी आत्महत्या केलेला रोहीत कचरू लांडगे याचा विवाह डिग्रस येथील अरोपी शिवाणी हिचे बरोबर झाला होता दि १५ /४ / २०२१ रोजी मयत रोहीत याचे सासरकडील अरोपी बिट्टुबाई शिनगारे ' सिमा बोरुडे, छकुल्या बोरुडे 'शरद शिंदे,मोइन शेख यांनी अरोपी शिवाणी हिस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणांमुळे व अरोपी शिवाणी हिस माहेरी घेऊन जाणेसाठी वारंवार अरोपी नं ३ छकुल्या उर्फ सतिष रावसाहेब बोरुडे हाच का येतो असे मयत रोहीत लांडगे याने विचारल्याच्या कारणावरून अरोपींनी मयत रोहीत यास वारंवार मारहाण व शिविगाळ केल्याच्या त्रासाला कंटाळून रोहीत याने आपले राहाते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली म्हणुन मयत रोहीत लांडगे यांची आई शिऊबाई कचरू लांडगे हिने.आरोपीं विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणुन फिर्याद दाखल केली होती सदर फिर्यादी वरून राहुरी पोलीस पी एस आय निरज बोकिल यांंनी आरोपीं विरुद्ध भा.दं. वि.क. ३०६, ३२३ , ५०४, ५०६, सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते

   सदर गुन्ह्यात आरोपी विरुद्ध गुन्हा शाबित करणे कामी अभियोग पक्षातर्फे आठ साक्षिदार तपासण्यात आले त्या मधे फिर्यादी , वैद्यकीय अधिकारी , तपासी अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एन आर नाईकवाडे साहेब यांनी अभियोग पक्षाने केलेला युक्तीवाद सादर केलेले एकंदरीत पुरावे परिस्थिती जन्य पुरावे ग्राह्य धरून अरोपींना ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले त्यांना पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. / १९४३, पो. हे . कॉ / २५८२, राजु वाघ,पो,कॉ भगवान थोरात,व पो कॉ महेश शेळके यांनी सहकार्य केले