कान्होबा यात्रे निमित्त वळण पिंप्रि मध्ये रंगला कुस्त्यांचा जंगी सामना.
सालाबाद प्रमाणे यावर्षी ही पिंप्रि- वळण येथील कान्होबा देवस्थान यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
पहिल्या दिवशी कावडी दुसऱ्या दिवशी काठीची मिरवणूक व तिसऱ्या दिवशी हजऱ्या व हंगामा असे यात्रेचे स्वरूप असते.
कानिफनाथ यात्रा यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीने नियोजन केले होते. या कुस्तीच्या आखाड्यात राज्यभरातील अनेक पैलवानांनी सहभाग नोंदवला. जळगाव ,धुळे, पुणे ,औरंगाबाद, बीड, सांगली अशा विविध भागातून आलेल्या पैलवानांनी आखाड्यामध्ये भाग घेतला होता.
कडेकोट पोलीस बंदोबस्त, एका वेळेस दोन कुस्त्या, उत्साहवर्धक कॉमेंट्री, मानाच्या पैलवानांना फेटा व मानधन, असे कुस्तीच्या आखाड्यात चे स्वरूप होते.
शेवटच्या आणि मानाच्या कुस्त्या चे मानकरी ठरले पिंप्रि गावचे भूषण विनोद डमाळे आणि विकास डमाळे. 5051 रुपयावर लागलेली कुस्ती अगदी धोबीपछाड अशा पद्धतीने झाली.
यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने मानाचे मानकरी ठरलेले पै.विनोद डमाळे व पै. विकास डमाळे यांचा सन्मान करण्यात आला त्याच प्रमाणे राज्यभरातून आलेल्या पैलवानांचा ही फेटा व मानधन देऊन सन्मान करण्यात आला.
पंचक्रोशीतून आलेल्या कुस्तीप्रेमींनी याचा मनमुराद आनंद लुटला. वेगवेगळे डाव ,कुस्ती करताना करण्यात येणारी पकड या गोष्टींने प्रेक्षकांना प्रभावित केले.
यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष यशपाल पवार त्याचप्रमाणे भागिनाथ शेटे, राजुभाऊ शेटे.राधेश्याम लहारे, दगडू साळवे, शरद डुकरे,जालिंदर कानडे, फकिरचंद आगलावे, लखन कानडे,जालिंदर काळे, भगवान कानडे, युवराज पवार, किशोर पुंड ,बाळासाहेब काळे ,सखाहरी पवार, शिवाजी डमाळे, संभाजी डमाळे, अप्पासाहेब गोलवड ,अभिमन्यू जाधव, जगन्नाथ जाधव, बाबासाहेब डमाळे, सुरेश बनकर, सतीश पंडित, रवींद्र मकासरे, माजी सरपंच गोलवाड, किशोर नांगरे, भरत काळे, दादासाहेब आगलावे ,दादासाहेब राजळेसाईनाथ आगलावे,अशोक राजळे,किशोर राजाळे, राजेंद्र गरुड, फक्कड जाधव, भारत कानडे, शरद कानडे, टिलू कानडे,माऊली गडाख,ऋषिकेश जाधव,रेवणनाथ बर्डे, आदी
ग्रामस्थांनी यात्रेच्या नियोजनात मोठा हातभार लावला.