अजय व तनुजाची जोडी जेजुरी गडावरील पराक्रमाने गाजतीय संपूर्ण महाराष्ट्रभर.

अजय व तनुजाची जोडी जेजुरी गडावरील पराक्रमाने गाजतीय संपूर्ण महाराष्ट्रभर.

जेजुरी गडावरील नवरदेवाचा अफलातून पराक्रम , पाच नाही अकरा नाही तर संपूर्ण तीनशे अंशी पायऱ्या चढून. तेही नववधूला घेऊन. अवघ्या एका तासाच्या कालावधीमध्ये नॉन स्टॉप गड चढण्याची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी या पठ्ठ्याने केली आहे.

       लग्न झाले की दुसऱ्या दिवशी कुलदैवताच्या दर्शनासाठी नवरदेव व नवरी जात असतात. पुणे जिल्ह्यात जेजूरीयेथील मार्तंड भैरव खंडेराय यांच्या गड जेजुरी देवस्थानला दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नवदाम्पत्य जात असतात.

    असेच एक (राहू ता. दौंड पुणे) नवदाम्पत्य जेजुरीस गेले आणि नवरीला उचलून पूर्ण जेजुरी गड पायी सर करण्याचे ठरवले. 

         गायकवाड कुटुंबातील असलेली कन्या तनुजा व नवले कुटुंबातील असलेला चिरंजीव अजय यांचा विवाह नुकताच झाला. जेजुरी गडावर जात असताना पाच पायऱ्या नववधूला उचलून चालण्याची पूर्वीपासून प्रथा आहे. परंतु नवरदेवाने नवरीला चक्क गडाच्या संपूर्ण 380 पायऱ्या उचलून घेऊन सर केल्या. त्यामुळे जाता येणारे भाविक या नवदाम्पत्यांकडे पाहुन कौतुक करत होते.एवढा गडवधूला घेऊन चढणे सोपी बाब नाही. एक तासात गड पार केला.गड चढल्यानंतर नवरदेवाचे हृदयाचे ठोके वाढले होते. दहा मिनिटे जागेवर थांबून विश्रांती घेतली व त्यानंतर भंडारा उधळून देवाचे दर्शन घेऊन खाली आलो, असे अजय व तनुजा यांनी सांगितले.

      येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात सर्व भाविकांनी या जोडप्याचे कौतुक केले. व शाल श्रीफळ देऊन देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.