पोलीस भरती मध्ये एन.सी.सी (NCC) बोनस गुण विरोधात विद्यार्थी आक्रमक.
महाराष्ट्र शासनाने पोलीस भरतीमध्ये एन.सी.सी प्रमाणपत्र धारकांना एकूण गुणा मध्ये 7.5 बोनस गुण देण्याचा शासन निर्णय राजपत्र दि.02 मार्च 2022 रोजी जाहीर केले .पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारावर सरळ अन्याय होत आहे पोलीस भरतीमध्ये सर्वसाधारण 12,00,000 उमेदवार असतात व दुप्पट उमेदवार एन सी सी प्रमाणपत्र धारक आहेत. सर्वसाधारण उमेदवारांने 150 पैकी 150 मार्क मिळवले व एन.सी.सी धारकाने 150 पैकी 145 व त्यात 7.5 बोनस गुण मिळवून 152.5 गुण होतात म्हणजे पोलीस भरती 150 गुणांची व एन.सी.सी विद्यार्थ्यांनी गुण मिळवले 152.5 गुण म्हणजे हा सरळ सरळ अन्याय आहे .सर्वसाधारण उमेदवार एन.सी.सी धारक उमेदवाराची बरोबरी करू शकणार नाही कारण 150 पैकी 150 मार्क जरी मिळवले तरी तो स्पर्धेत टिकू शकणार नाही. म्हणून शासनाने हा अन्याय थांबवावा व हे राजपत्र तात्काळ रद्द करावे अशी मागणी पोलीस भरती उमेदवार करत आहेत शिवाय मागील तीन वर्षापासून कोरोनामुळे पोलीस भरती नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे त्याचाही शासनाने पाठपुरावा करावा व पोलीस भरतीची पुढील जाहिरात येईपर्यंत वयोमर्यादा वाढवावी ही विद्यार्थ्यांची शासनाला विनंती आहे .