आगामी निवडणूका प्रहार स्वबळावर लढवणार राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पा.

1. आगामी निवडणूका प्रहार स्वबळावर लढवणार .राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पा.

आगामी जिल्हा परिषद. पंचायत समिती. नगरपालिका.निवडणुका प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढवूण कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे पूर्ण ताकदीनिशि उभा राहणार.असल्याचे .वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष श्री सुरेशराव लांबे पा. यांनी व्यक्त केले.तालुक्यातील बारागाव नांदूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे उदघाटण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि श्री नजिर भाई काकर हे होते.यावेळी राहुरी तालुका उपाध्यक्षपदी इनुस जब्बार देशमुख.तालुका अल्पसंख्यांक अध्यक्षपदी फैजान अब्दूल कादर देशमुख. शाखाध्यक्ष.आसिफ शेख बारागाव नांदूर गट प्रमुख विकास ससाणे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी बोलताना श्री लांबे म्हणाले राहुरी विधानसभा मतदारसंघातील सामाजीक कामे करण्यात प्रहार सैनिक नेहमी अग्रेसर राहतील. सर्वसामान्य गोरगरीब वृद्ध अल्पसंख्याक दिव्यांग शेतकरी शेतमजुर कामगार प्रकल्पग्रस्त. यांचे विविध प्रश्न सोडवण्यास विशेष प्राधान्य दिले जाईल प्रहार सैनिकांनी कोणत्याही थापाला व दादागिरीला बळी पडू नये. त्यांच्या मागे पक्ष भक्कमपणे पाठीशी उभा राहील.तसेच गावागावात प्रहारच्या शाखा उघडणार असल्याचे सांगितले .यावेळी श्री लांबे यांच्या हस्ते बारागाव नांदूर नूतन शाखेचे फीत कापून अनावरण करण्यात आले. यावेळी विक्रम कुमार गाडे. मच्छींद्र सर.पै. नजिरभाई काकर.एम आझाद सोशल क्लबचे रइसभाई शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उमरभाई शेख. शाकीरभाई पठाण. अमजदभाई पठाण. भास्करराव कोहोकडे.संदीप गाडे. सोपान गाडे. आशोक गाडे. मुनाफ भाई देशमुख. जाकीरभाई सय्यद. राजुभाई इनामदार. वाजिद पिरजादे. इरफान सय्यद. हबीबभाई देशमुख. आमिनभाई काकर.आदींसह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते. शेवटी युनुस शेख यांनी उपस्थीतांचे आभार मानले.