26 जानेवारी रोजी विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर वरवंडी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे प्राणांतिक आमरण उपोषण .

26 जानेवारी रोजी विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर वरवंडी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे प्राणांतिक आमरण उपोषण .

राहुरी तालुक्यातील वरवंडी ग्रामपंचायत येथील अनेक वर्षापासून मागासवर्गीय दफनभूमी असलेले जमिन क्षेत्र ग्रामपंचायत कब्जेमध्ये असून स्मशानभुमी विकासासाठी मंजुर झालेला जनसुविधा योजने अंतर्गत निधी वापरण्यास विद्यापीठ ना हरकत दाखला मिळणेकामी ग्रामपंचायतच्या वतीने विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर दि. 26 जानेवारीरोजी प्राणांतिक आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन विद्यापीठ कुलसचिव यांना देण्यात आले आहे .

               वरवंडी गावाने म .फु.कृ.विद्यापीठासाठी अनेक हेक्टर क्षेत्र संशोधन व विकासासाठी दिलेले आहे . गेल्या 50 ते 60 वर्षांपासून वरवंडी येथील गट क्र. 234 मध्ये 0.60 आर क्षेत्र हे भोगवटदार सदरी हरीजन स्मशानभूमीची 7 / 12 वर नोंद होती. आजही 30 ते 40 वर्ष जून्या मृत व्यक्तींच्या कबरी अस्तित्वात आहेत. विद्यापीठ प्रशासनाने स्वतःच्या कब्जात असलेल्या क्षेत्रावर उंच बंधारा घालून सरहद्द देखील निश्चित केलेली आहे .

           विद्यापीठ कुलसचिव यांच्या मालकी सदरी असलेल्या 185 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण झाल्याचे श्री . वानखेडे हे कुलसचिव असताना मोजणीमध्ये निदर्शनास आले आहे . डिग्रस परिसरात 40 एकर जमिनीवर धार्मिक कारणाच्या नावाखाली अतिक्रमण होऊन त्यांना सर्व सुविधा ग्रामपंचायत मार्फत देण्यात येत आहेत . विद्यापीठ प्रशासकिय इमारती लगत जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 5 ते 6 वर्षापूर्वी असलेले बेकायदेशीर असलेले मंदिर पाडण्याचे आदेश असताना ते पुन्हा चालू करण्यात आले आहे .

             विद्यापीठ पेट्रोल पंपावर लाखो रुपयांचा मुरूम टाकण्यात आला आहे . काही अधिकार्‍यांचे बंगले देखील विद्यापीठ हद्दीत बांधलेले आहेत. अवैधरित्या चालणस्या सर्व घटनांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जाते परंतु वरवंडी ग्रामपंचायत भोगवटदार सदरी नोंद असलेली व कायदेशीररित्या ग्रामपंचायत कडे वर्ग होणे प्रस्तावित असलेल्या जागेमध्ये केवळ शासकिय निधिचा वापर हरिजन स्मशानभूमीसाठी होऊ नये यासाठी विद्यापीठ कुलसचिव यांची अडवणुकीची भुमिका चुकिची आहे . इतर गावातील कामांसाठी आपण ना हरकत देऊन कामे पूर्ण केल्याचे निवेदनात म्हटले आहे . 

    

         शासकिय निधिचा वापर करण्यासाठी वरवंडी ग्रामपंचायतीस ना हरकत मिळणेसाठी व गावातील नागरिकांच्या हक्कासाठी प्राणांतिक आमरण उपोषण करणार असल्याचे वरवंडी गावचे सरपंच व सदस्य यांनी सांगितले आहे . या निवेदनावर विद्यापीठ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .