लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नाव राहुरी शहरातील जुन्या सरकारी दवाखान्यात समोरील चौकाला देण्यात यावी -

लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नाव राहुरी शहरातील जुन्या सरकारी दवाखान्यात समोरील चौकाला देण्यात यावी -

आज दिनांक 23 1 2023 रोजी सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली राहुरी नगरपरिषदेवर धडकला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा निवेदन घेऊन मोर्चा 

लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नाव राहुरी शहरातील जुन्या सरकारी दवाखान्यात समोरील चौकाला देण्यात यावी या मागणी करिता सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने राहुरी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आली राहुरी शहरातील पौराणिक राहू असुर संस्कृतीचा मोठा संदर्भ आहे कष्ट करून जगणारी न्यायाने वागणारी स्वतंत्र समता ही मूल्य जपणारी लोक म्हणून असुर संस्कृतीचा उल्लेख केला जातो तसेच ऐतिहासिक क्रांतिकारक चळवळी येथे घडल्या आहेत संयुक्त महाराष्ट्र राज्याचा लढा चालू असताना अण्णाभाऊ साठे राहुरी तालुक्यातील कॉम्रेड टीव्ही कडू पाटील यांच्या घरी वास्तव्यात होते डाव्या समाजवादी पुरोगामी विचारधारेने राहुरी शहराची जडणघडण केली आहे आपण शहराच्या परंपरेला शोभणारी विचार व्यवहार करणे आपली जबाबदारी आहे म्हणून शहराच्या मध्यवर्ती असलेल्या आणि जुन्या सरकारी दवाखान्यासमोर असलेल्या चौकाला लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अण्णाभाऊंच्या कार्यकर्तुत्वाने साहित्यिक चळवळ उभी केली शाहीरने जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावले आणि त्यांच्या चळवळीने संयुक्त महाराष्ट्राची निर्मितीची मोट बांधली गेली हे आपण सर्वजण जाणतो म्हणून आपण सदरील चौकाला अण्णाभाऊ साठे हे नाव दिल्यास राहुरी शहराच्या पुरोगामी परंपरेला उजळ करणारे ठरेल तसेच शाहीर कलावंत कार्यकर्ता लेखक विचारवंत या सर्व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन नवीन पिढी शहराच्या भविष्याचा आधार बनेल आणि नगरपालिकेकडून झालेला अण्णाभाऊंचा सन्मान अण्णाभाऊ कायम लक्षात ठेवतील अशा या मागणीचे निवेदन घेऊन सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबाजी जगधने व अहमदनगरचे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री नंदू भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी साहेब यांना हे निवेदन देण्यात आले निवेदन देण्याकरिता तालुक्यातील व शहरातील विविध सामाजिक संघटनेसह लक्ष्मी नगर येथील सर्व कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक देखील या वेळेस उपस्थित होते त्याचप्रमाणे सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे राज्य प्रवक्ते म्हणून काम करीत असलेले निलेश मच्छिंद्र जगधने दीपक लक्ष्मण आव्हाड कांतीलाल भाऊ जगधने यांनी या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा करून तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना बोलावून समजावून सांगितले यावेळेस उपस्थित अमोल हरिदास जगधने राजेंद्र वसंतराव जगधने आकाश बाळासाहेब जगदले अभिषेक घोरपडे बाबासाहेब शेलार पापाभाई दिवार पिंटू नाना साळवे नगरसेवक सोने बापू जगधने लहुजी वस्ताद समितीचे संतोष भाऊ जगधनेव इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.