आदिनाथ ठोंबरे यांच्या आग्रहाखातर जिल्हा परिषद शाळेला मा.खासदार सुजय विखे यांनी दिल्या वर्ग खोल्या.

आदिनाथ ठोंबरे यांच्या आग्रहाखातर जिल्हा परिषद शाळेला मा.खासदार सुजय विखे यांनी दिल्या वर्ग खोल्या.

आदिनाथ ठोंबरे यांच्या आग्रहाखातर जिल्हा परिषद शाळेला सुजय दादा विखे यांनी दिल्या दोन वर्ग खोल्या.

   नेवासा ( प्रतिनिधी):- नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला माजी खासदार सुजय दादा विखे यांनी युवा नेते आदिनाथ ठोंबरे यांच्या आग्रहाखातर शाळेच्या दोन वर्ग खोल्या मंजूर केल्या होत्या. त्या खोल्याचे काम पूर्ण झाल्याने सुजय दादा विखे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी नूतन शाळेच्या खोल्याची रिबीन कापून लोकार्पण सोहळा पार पडला. यानंतर हनुमान मंदिर सभामंडपात कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊराव कारभारी ठोंबरे होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते आदिनाथ ठोंबरे यांनी केले.

आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. 

यावेळी सुजय दादा विखे बोलताना म्हणाले की कार्यकर्ता आदिनाथ सारखा हाडाचा असावा ज्यांनी पाठपुरावा करून खुल्याची कामे मंजूर करून घेतली या मतदारसंघात खासदार नसूनही कामे मंजूर करून दिली फक्त कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर करावं लागतं अन भविष्यात तुमच्या गावातील कोणतेही काम सांगा मी करेल अशी आश्वासन दिले.

      या कार्यक्रमाप्रसंगी 

युवा नेते उमेश हंडाळ ,दादा भिसे ,खंडेश्वर वाघमोडे, शंकर कोकरे, मनाजी कोकरे मुकादम ,बबनभाई सय्यद , अविनाश वाघमोडे, बाळासाहेब कोकरे,गटशिक्षणाधिकारी सैलता सामलेटी ,विस्तार अधिकारी केदार मॅडम ,जिल्हा परिषद मुख्याध्यापक मरकड सर व सर्व शिक्षक वृंद व पाचुंदा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे आभार भाऊसाहेब दादा होंडे यांनी मानले.