डि पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश संपूर्ण विश्वाला देणारे क्रांतीसुर्य, घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या हर्षात साजरी

डि पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश संपूर्ण विश्वाला  देणारे क्रांतीसुर्य, घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर  यांची 134 वी जयंती मोठ्या हर्षात साजरी

श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) - डि पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश संपूर्ण विश्वाला  देणारे क्रांतीसुर्य, घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर  यांची 134 वी जयंती मोठ्या हर्षात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाचे व्यवस्थापक, रेव्ह फादर फ्रॅंको, प्राचार्या, सिस्टर सेलीन यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला कोटी कोटी प्रणाम. भारतीय समाजात समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा  पाया रचणाऱ्या महामानवाच्या योगदानाचे आणि संघर्षांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. ह्या कार्यक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद रवींद्र लोंढे, गणेश पवार, संदीप निबे, विकास वाघमारे, हरविंदर सिंग सिद्धू, दीपक कदम, राहुल पावसे, सुनील बोरगे, जयश्री ब्राह्मणे, स्नेहलता नेवे वाणी, सुनिता सोनवणे, मॉली कुथूर, सोनाली झांजरी, अनुराधा कपिले, बिना कदम ,मालन मोहन, रुकसाना पठाण, एलिझाबेथ वाकडे ,सुनयना भालेराव, स्वाती घोरपडे, प्रतीक्षा साळवे, मोहिनी बाहुले ,माधुरी महाडिक, वैशाली निंबाळकर ,पूजा थोरात, ज्योती ब्राह्मणे, नीता वराळे, वैशाली कदम, अनुराधा गुंजाळ, अनिता बोधक, नंदा पवार, शिना कुथूर, प्रतीक्षा कोळगे, रिटा ओबेरॉय, आयशा शेख, सुजाता जग्गी, रिटा कांबळे, अर्चना झरेकर, सुशीला जाधव ,स्वाती गायकवाड, अपर्णा नायर, जेलफिना कुथूर, शिक्षकेतर कर्मचारी आशा गायकवाड, मंदा पारधे ,रूपाली विघावे, आम्रपाली साळवे, सविता गायकवाड,  प्रिती भालेराव आदि उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते, शिक्षणाचा प्रसार करणारे ज्ञानदेवता ते, दीनदुबळ्यांच्या हाकेस धावून जाणारे महापुरुष ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस  विनम्र अभिवादन.