दुचाकी अडवून निपाणी वडगांव येथील शिवारात खुनाचा प्रयत्न …! ! चार जणां विरुध्द गुन्हा दाखल. .! !

दुचाकी अडवून निपाणी वडगांव येथील शिवारात खुनाचा प्रयत्न …! ! चार जणां विरुध्द गुन्हा दाखल. .! !

श्रीरामपूर:: -- श्रीरामपूर तालुक्या नजीक असणाऱ्या निपाणीवडगाव येथील वैदू वसाहतीत राहणाऱ्या मोठेबाबा लोखंडे यांनी तेथील राहात असणाऱ्या लोकांवर जुन्या  वादातून मोठेबाबा यांनी मागील काही दिवसांपूर्वी फिर्याद दाखल केली होती. त्या फिर्यादीचा राग मनात धरून काल सायंकाळी चौघा जणांनी 'तू केस मागे घ्यायला सांग' असे म्हणत मोठेबाबा लोखंडे यांना वडाळा महादेव ते निपाणी वडगाव या रस्त्यावर असणारे मनाली गार्डन या ठिकाणी गाडी अडवून मारहाण करून हातात असलेल्या चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न गुन्हा दाखल झालेल्या तरुणांनी केला.त्यात चाकूने वार झाल्याने मोठेबाबा लोखंडे हे जबर जखमी झाले आहेत.काल मनाली गार्डनजवळ, वडाळामहादेव या शिवारात सायं. 6 वाजता हा खूनाचा प्रयत्न झाला.घटनास्थळी डि.वाय.एस.पी. श्री.संदीप मिटके, पोलीस निरीक्षक श्री. खाडे, पोलीस इन्स्पेक्टर श्री. सुरवाडे यांनी भेट दिली. याप्रकरणी जखमी मोठेबाबा सालचा लोखंडे, (वय - 49 )  रा.निपाणीवडगाव, ता. श्रीरामपूर यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून मारहाण करणारे आरोपी सुरेश मारूती लोखंडे, चंदन मारूती लोखंडे, आकाश सुरेश लोखंडे, मंगेश लक्ष्मण दासरजोगी सर्व रा. निपाणीवडगाव, ता.श्रीरामपूर यांच्याविरूद्ध भादंवि कलम 307, 323, 504, 506, 427, 34 प्रमाणे खूनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोठेबाबा लोखंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी माझ्या मोटार सायकलवरून वडाळा येथून निपाणीवडगावकडे येथे जात असताना वडाळामहादेव शिवारात मनाली गार्डनजवळ आरोपींनी थांबवून मला त्यांच्या हातातील असणाऱ्या लाकडी दांड्याने माझ्या दुचाकीचे मोठे नुकसान केले व दहशत निर्माण करून एका आरोपीने माझ्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली, चाकू काढून वैदू भाषेत " तू माझ्यावरची केस मागे घ्यायला सांग नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही तुला जीवे मारून टाकू " अशी धमकी देवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने माझ्या मानेवर चाकूने वार केला असता तो मी प्रसंगावधान राखून हुकवला असता तो वार माझ्या हातावर लागून गंभीर जखम झाली. येव्हढ करून देखील आरोपी थांबले नाही तर  आरोपींनी मला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन रस्त्यांवर फेकून दिले. जखमी मोठेबाबा लोखंडे यांच्यावर साखर कामगार रूग्णालयात उपचार सुरू असून पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक  पोलीस निरीक्षक श्री. समाधान सुरवाडे हे पुढील तपास करीत आहेत.