पिंप्री अवघड येथे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व सोसायटीच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा .

पिंप्री अवघड येथे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व सोसायटीच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा .

पिंपरी अवघड येथे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व सोसायटीच्यावतीने महिला दिन उत्साहात साजरा

 

            राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी अवघड यांच्या सयुक्त विद्यमाने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले.

 

           यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लांबे यांची कन्या व जिल्हा परिषद शाळेची माजी विद्यार्थीनी हिची नुकतीच शेवगाव तालुक्यातील बेलगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याने अमृता जाधव (लांबे) हिचा सन्मान करण्यात आला. तसेच पिंपरी अवघड ग्राम पंचायतच्या माजी सरपंच रेखा पटारे, माजी सरपंच परवीन बानो शेख, ग्रामसेविका शुभांगी चोखर, शिक्षिका संगीता देवरे मॅडम ज्योती पुरी मॅडम, अंगणवाडी सेविका चंद्रकला लांबे व निर्मलाताई पवार, संगीता बेद्रे, व शाळेतील विद्यार्थ्यांनीचा ही महिलादिना निमित्त सत्कार करण्यात आला.

             यावेळी महिला दिनानिमित्त अनिल पवार सर यांनी आपल्या देशातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची माहिती देऊन आपणही असाच आदर्श समोर ठेवला पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रहारचे नेते व प्रगतशील शेतकरी सुरेशराव लांबे हे होते तसेच प्रमुख उपस्थिती विविध कार्यकारी चेअरमन मच्छिंद्र पाटील लांबे व उपसरपंच लहानु बाचकर यांनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. 

 

             यावेळी उपसरपंच लहानू तमनर, बापूसाहेब पटारे, शरद लांबे, शिवाजी लांबे, रमेश दौंड, अर्जुन बाचकर, मोहन लांबे, त्रिंबक लांबे, माधव लांबे मधुकर लांबे, वसंत लांबे, संजय लांबे, शरद पवार, बंटी लांबे, नरेंद्र घुले, जगन्नाथ गायकवाड, कृष्णा कांबळे, संजय वाघमारे, तुकाराम लांबे, किशोर लांबे, चांगदेव लांबे, अनिल लांबे, अमोल लांबे, चंद्रकांत लांबे, आदिनाथ लांबे, महेश महाराज लांबे अरुण लांबे,मुख्याध्यापक जवरे सर, शिवाजी नवाळे सर, मच्छिन्द्र नागटिळक सर यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल कल्हापुरे सर यांनी केले व कर्यक्रमाचे आभार पवार सर यांनी मानले.