जुन्या वादाची मनी धरूनी गाठ,फरशीचा तुकडा डोक्यात घालून मित्रानेच लावली मित्राची वाट.
दिल्ली 91न्यूज नेटवर्क वृत्तांत.
वृत्तांकन:- प्रतिनिधी संभाजी शिंदे .खेडले परमानंद
मागिल वादाचे कारणावरुन मित्राने केला खुन, श्रीरामपूर येथील खुनाच्या गुन्ह्याची 24 तासाचे आत उकल स्थानिक गुन्हे शाखेकडुन आरोपी जेरबंद.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी साकीब उस्मान शाह वय 20, धंदा मजुरी, रा. सुभेदारवस्ती, श्रीरामपूर यांचा मयत भाऊ शाहरुख ऊर्फ गाठण उस्मान शाह याचा कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणावरुन डोक्यात फरशी मारुन जखमी करुन जिवे ठार मारल्याने श्रीरामपूर शहर पो.स्टे.गु.र.नं. 1072/23 भादविक 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ/ संभाजी कोतकर अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन ना उघड गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणण्यासाठी पथकास तात्काळा रवाना केले. पथकाने मयताचे कुटूंबियाकडे विचारपुस करत असताना मयताचे कुटूंबियांनी काही दिवसांपुर्वी मयत शाहरुख याचे अशोक साळवे याच्या बरोबर वाद झाला होता अशी माहिती दिली.
पथकाने त्या आधारे संशयीताचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही. त्यामुळे पथकाचा संशय अधिक बळावला. पथकाने लागलीच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे त्याचा शोध घेता तो पिंपरी चिंचवड, जिल्हा पुणे येथे असल्या बाबतची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने तात्काळ पिंपची चिंचवड, जिल्हा पुणे येथे जावुन संशयीत आरोपीचे ठाव ठिकाण्याबाबत माहिती घेवुन त्याला ताब्यात घेतले व त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक ऊर्फ बाबुराम साळवे रा. नॉर्दन ब्रॉच, श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले.
त्याचेकडुन वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने माझे, मयत शाहरुख शाह याच्या सोबत वाद झाला होता, त्याचा राग मनात धरुन डोक्यात फरशी मारुन खुन केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर, स्वाती भोर , अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व . बसवराज शिवपुजे , उविपोअ, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.