मुळा पाटबंधारे विभागाला धरणाच्या पाण्याची अॅलर्जी,हा विभाग पितो जारचे पाणी .

मुळा पाटबंधारे विभागाला धरणाच्या पाण्याची अॅलर्जी,हा विभाग पितो जारचे पाणी .

मुळा पाटबंधारे विभागाला धरणाच्या पाण्याची अॅलर्जी, हा विभाग पीतो जारचे पाणी .

 

  प्रतीनिधी : आर . आर . जाधव.

 

       अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेले मुळाधरण या धरणाच्या पाण्यावर अहमदनगर महानगर पालीका, जिल्हा परिषद ,एम आय डी सी , संरक्षण यंत्रणे सह राहुरी ,नेवासा , शेवगाव, नगर , पाथर्डी, पारनेर हे अवलंबुन असुन ह्या पाण्याचा पुर्ण वापर जनता करत आहे . हे धरण देखरेखी साठी प्रत्यक्षात ज्यांच्या ताब्यात आहे

 आहे ते मुळा पाटबंधारे विभाग कार्यालय अहमदनगर महानगर पालिका हद्दीत महानगर पालिका कार्यालया समोर असुन ही या धरणाचे पाणी हे कार्यालय पीत नाही तर समजलेल्या वृत्ता नुसार हे कार्यालय अक्षरशः जारचे पाणी पीते व त्या पोटी दर तिन महीण्याला चक्क सुमारे चार हजार रुपयाचे बिल जार पुरवठादाराला देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे .

 

           अहमदनगर जिल्ह्यातील ८०% जनता मुळा धरणाच्या पाण्याचा वापर करत आहे मात्र ज्यांच्या ताब्यात प्रत्यक्षात हे धरण असताना ह्या धरणाचे पाणी हे विभागीय कार्यालय का वापत नाहीत असा सवाल जनतेतुन होत आहे या पाण्यात काही दोष या विभागाला अढळून आले आहेत का ? अशीही शंका निर्माण झाली आहे .

 

         या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पिंजरा पद्धतीचे मत्स्यपालन केले जाते .या धरणात सुमारे २५० ते ३०० इतके मत्स्य पिंजरे कार्यरत असुन या पिंजऱ्यातील माशांना हजारो क्कींटल मत्स्य खाद्य टाकले जाते . ह्या मत्स्य खाद्यातील केमीकल ह्या पाण्यात मिसळत आहे त्यामुळे हे पाणी दुषीत झाल्यानेच मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर ह्या पाण्याचा वापर पिण्यासाठी न करता जारचे विकतचे पाणी पीत असावे असा संशय मुळा धरणाचे पाणी वापरणाऱ्या नागरीकांना येत आहे .

 

        मुळा धरणाच्या पाण्याची काटेकोर तपसाणी व्हावी . या चाचणीत मत्स्य खाद्याचे केमीकल अढळल्यास हे पिंजरा पद्धतीचे मत्स्य पालण तात्काळ थांबवावे अशी जनतेतून मागणी होत आहे .