मुलांमधील माणुसकी वृद्धिंगत करण्यासाठी " माणुसकीची शाळा" हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे -चेअरमन संजय साळवे .
श्रीरामपूर : कोरोना कालावधी पासून माणुसकी लोप पावत चालली आहे.सध्याची परिस्थिती देखील माणुसकीला काळीमा फासणारी आहे.अशाही परिस्थितीत मुलांमधील माणुसकी वृद्धिंगत करण्यासाठी "माणुसकीची शाळा" हा उपक्रम नक्कीच नितीमुल्ये जोपासण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.असे प्रतिपादन माणुसकीची शाळा प्रबोधन कार्यशाळा कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी केले
अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व मिशन माणुसकी यांच्या संयुक्त विद्यमाने सहर्षा हाॅल बोंबले पाटील नगर यांठिकाणी माणसात माणूसपण पेरणारी माणुसकीची शाळा एकदिवसीय प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपंग सामाजिक विकास संस्थांच्या सचिव वर्षा गायकवाड होत्या. कार्यक्रमासाठी मिशन माणुसकीचे संचालक शिवाजी नाईकवाडी,सामाजिक एकता विचारमंचचे सुधाकर बागुल,कु. सहर्षा साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अहमदनगर येथील माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी,ओम शिंदे,युवराज पाटील,आर्या मिसाळ,नुपुर घटे,शौर्या न्यायपलली,अनुष्का पाटील यांनी विविध खेळांच्या व चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना नितीमुल्ये शिकवली.
दुपारच्या सत्रात श्री. संभाजी पवार राहुरी,श्रीमती सोनम धिवर,श्री राजेन्द्र हिवाळे सर यांनी मनोरंजनात्मक खेळांच्या माध्यमातून माणुसकी धर्माची शिकवण दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमोल सोनवणे यांनी केले तर आभार राहुल साळवे यांनी मानले.