सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांच्या गावी नवीन कमानीची उभारणी.

सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांच्या गावी नवीन कमानीची उभारणी.

प्रतिनिधी :-संभाजी शिंदे ,खेडले परमानंद

       ऐतिहासिक कमान उभारणी

आज रविवार दिनांक 29.05.2022 रोजी सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांची कमान त्यांच्या चांदा या गावी उभारण्यात आली.

सकाळी 9.30 वाजल्यापासूनच गावात सरसेनापती माणकोजी दहातोंडे प्रतिष्ठान चे कार्यकर्ते तसेच चांदा परिसरातील अनेक शिवप्रेमी उपस्थीत होते.

  सरसेनापती माणकोजी दहातोंडे प्रतिष्ठान चांदा तर्फे सकाळी महादेव, आई तुळजाभवानी, राम मंदिर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करण्यात आली. तसेच कमानीच्या पायाची पूजा करण्यात आली.

 

दोन हायड्रा व फराना मशीनच्या मदतीने सुरवातीस दोन्ही पिलर (पाया) उभारण्यात आले नंतर दोन्ही मशीनच्या सहाय्याने आडवा पैनेल बसवण्यात आला.यावेळी सर्व शिवप्रेमींचा उत्साह पाहण्यासारखा होता. सर्वांनी अतिशय योग्य प्रकारे मदत केली. वाहतूक नियंत्रणाचे महत्वाचे काम सर्व शिवप्रेमींनी अतिशय व्यवस्थित पार पाडले.

आज सर्व शिवप्रेमींनी केलेली मदत पाहून आम्ही सर्व भारावून गेलो. आम्ही सर्व शिवप्रेमींचे सरसेनापती माणकोजी दहातोंडे प्रतिष्ठान तर्फे खुप खुप आभार व्यक्त करण्यात आले.