शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न.
शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव; गुणवंतांचा सन्मान सोहळा उत्साहात
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी //संभाजी शिंदे
इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पालक, शिक्षक व मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन सध्या इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या वेदिका गडाख, ओम आयनर, कुणाल गर्जे, अवधूत गडाख, आदित्य लोहकरे, सृष्टी डोळे, स्वरा चौरे, श्रुती डोळे, ज्ञानेश्वरी ढोबळे आणि अनुज बडे या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या शिवानी देशमुख आणि प्रांजल साळवे यांचाही गौरव करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक गणेश गडाख, सुभाष आयनर, संतोष डोळे, महेश डोळे, ईश्वर गर्जे, गणेश चौरे, नवनाथ गडाख, मनोहर ढोबळे, दीपक बडे आणि गणेश लोहकरे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्राचार्य अनिल पिसाळ, उपप्राचार्य कडेल सर, पर्यवेक्षक बनकर सर, तसेच पवार सर, चव्हाण सर, त्रिपाठी सर, नाईकवाडी सर, आऔटी सर, डांगे सर, मिसाळ मॅडम, कोळी मॅडम, काळे मॅडम आणि घाडगे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर भविष्यातही मोठे यश संपादन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गडाख सर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालकांनी शिक्षकांचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.








