अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता, सोनई पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल. .

अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता, सोनई  पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल.  .

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी/संभाजी शिंदे

बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध सुरू सोनई पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल; 

नेवासा तालुक्यातील वांजोळी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मुलीचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, २७ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास वांजोळी येथील राहत्या घरातून संबंधित अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. मुलीची सर्वत्र शोधाशोध करूनही ती आढळून न आल्याने तिच्या आईने सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेपत्ता मुलगी अंदाजे ५ फूट १ इंच उंच, गोरा रंग, गोल चेहरा, काळे डोळे, सडपातळ बांधा असून घरातून जाताना लाल रंगाचा टॉप व पांढऱ्या लेगिंग्ज परिधान केल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे.

या प्रकरणाचा तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी. एम. गावडे करत पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ सोनई पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून, अल्पवयीन मुलीचा सुरक्षित शोध घेण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येत आहे.ल्हा प्रतिनिधी//