मोटार सायकल चोरी करणारा आरोपी अहिल्यानगर शहरातून जेरबंद.

मोटार सायकल चोरी करणारा आरोपी अहिल्यानगर शहरातून जेरबंद.

मोटार सायकल चोरी करणारा आरोपी अहिल्यानगर शहरातुन जेरबंद;आरोपीकडुन चोरीच्या 05 मोटार सायकल हस्तगत .

अहिल्या नगर प्रतिनिधी//

 याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की दि 17/07 /2026रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 01.00 वा सुमारास वेणुगंगा कन्सलटन्सी सर्विसेस एकविरा चौक पाईपलाईन रोड साईकृपा बिल्डिंग अहिल्यानगर येथे फिर्यादी हे त्यांच्या मालकीची मोटार सायकल क्र एम.एच.16.सी.एच.7552 ही पार्किंगमध्ये हॅण्डल लॉक करुन लावेली असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता चोरुन नेले या बाबद फिर्यादी शशिकांत भाऊसाहेब गलबले रा. देऊळगाव गलांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 613/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 त्या अनुषंगाने संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, फुरकान शेख, दिपक घाटकर, भिमराज खर्से, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड़ यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रवाना केले,  

 सदर पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देवुन तांत्रीक विश्लेषण व गुप्तबातमीचे आधारे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना दिनांक 26/07 रोजी पथकास सदरचा गुन्हा हा आरोपी किशोर जयसिंग पठारे रा. पिंपळगाव माळवी . अहिल्यानगर याने केला असुन ते त्यांचेकडील एच.एफ. डिलक्स मोटार सायकल नंबर एम.एच.16. सी.एच.7552 यावरुन रामवाडीकडुन तारकपुर बस स्टॅण्डकडे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पथक बातमीतील माहितीनुसार रामवाडीकडुन तारकपुर बस स्टॅण्डकडे येणारे रोडवर सापळा रचुन थांबले असता बातमीतील वाहन येतांना दिसुन आले. तेव्हा सदर वाहन चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव किशोर जयसिंग पठारे वय-45. पिंपळगाव माळवी आहे अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. 

 ताब्यातील इसमाचे कब्जातुन 1,55,000/- रुपये किमतीचे 5 मोटार सायकल असा एकुण 1,55,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

 ताब्यातील आरोपीकडे त्यांनी आणखी अशा प्रकारे गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल तपास करता आरोपीकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत.

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम

1 तोफखाना जि. अहिल्यानगर 613/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2)

2 रांजणगाव जि.पुणे 345/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) 

3 शिरुर जि.पुणे 831/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2)

ताब्यातील आरोपी वरील गुन्ह्याचे तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.