राहुरी येथे नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

राहुरी येथे नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

राहुरी येथे नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

राहुरी - येथे दिव्यांग विभाग स्वातंत्र्य मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त,डॉ.चंद्रकांत गिरगुणे,आनंदऋषीजी नेत्रालय अ.नगर व राम रामेश्वर फाउंडेशन तसेच दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, व दंत तपासणी शिबिर,अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन मिनी आय टी आय कॉलेज रोड येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगन्नाथ सूर्यवंशी यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 

प्रहार दिव्यांग संघटना महिला तालुका अध्यक्ष सौ.छायाताई हारदे होत्या.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत डॉ.चंद्रकांत गिरगुणे यांनी केले. मोतीबिंदू शिबिरात ९० पेशंट तपासण्यात आले,त्यापैकी १८ पेशंट मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आली.या रुग्णाची तपासणी डॉ.शेलार यांनी केली.तसेच दंतरोग तज्ज्ञ डॉ.महेश ईघे यांनी ४५ पेशंटची तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार केले.

आत्तापर्यंत ७९ शिबिर पार पडले असून ४३३७ इतक्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पुर्ण झालेल्या आहेत.

 या कार्यक्रमास प्रहार दिव्यांग तालुका अध्यक्ष योगेश लबडे,कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त गोरक्षनाथ गायकवाड,तुकाराम बाचकर,रवींद्र भुजाडी,सुभाष कोकाटे,बाबुराव शिंदे,अण्णा आघाव,जुबेर मुसानी,विष्णू ठोसर,सौ. राजश्री घाडगे,अर्चना लबडे,राजेंद्र सोनवणे,सुखदेव कीर्तने,सलीम भाई शेख, गायकवाड सोमेश,प्रतीक धीमते,सुखदेव कीर्तने,संतोष सरोदे,नानासाहेब गववाघ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते

 या कार्यक्रमात डॉ.शेलार यांनी शिबिरार्थिना मार्गदर्शन केले य प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे,सेवा निवृत्त शिक्षक संजय ईघे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले,शेवटी कार्यक्रमाचे आभार श्री कोकाटे सर यांनी मानले.