अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक जाणीवेच्या भावनेतून जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे मुलीचा वाढदिवस चिमूरड्या सोबत साजरा!!!
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कू. श्रेया लखन शिरसाठ व शिक्षिका श्रीम. कदम मॅडम यांचा वाढदिवस शाळेतील मुलांबरोबर साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम शिवचरित्रकार शिवशाहीर ह भ प कृष्णा महाराज शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमूख मान्यवर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अभिजीत ससाणे यांनी केले. यावेळी ते म्हणाले पुरुषप्रधान देशात या नवीन पिढीत खूप बदल झाला आहे. सुशिक्षित समाज मुलगा व मुलगी आता एकसमान मानायला लागले आहेत याचंच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे लखन शिरसाठ यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक जाणिवेच्या भावनेतून शाळेतील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल या शालेय साहित्याचे वाटप करून एक मोठे सामाजिक कार्य केले आहे. कारण या शाळेत गरीबाची मुले शिक्षण घेत आहेत. व यापुढे काळात सर्वच पालकांनी असे नवनवीन उपक्रम शाळेत चिमूरड्या सोबत करावे व जीवनाचा आनंद घ्यावा. अशा शब्दात भावना व्यक्त करत श्रेया व श्रीम. आश्र्विनी कदम मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शिरसाठ कुटुंबाचे अभिनंदन केले.
कू. श्रेया व श्रीम. आश्र्विनी मॅडम यांचा प्रमूख मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार युनूसभाई पठाण व कृष्णा महाराज शिरसाठ यांनीही आपले मनोगत व्यक्त करत कू.
श्रेया व आश्र्विणी कदम मॅडम यांना शुभेच्छा दिल्या.
राम वैरागार, बाबाभाई शेख, संदीप शिरसाठ ,लखन शिरसाठ, ह भ प कृष्णा महाराज शिरसाठ, अभिजित ससाणे, बंडु शिरसाठ, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एन .धामणे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शाळेचे प्राचार्य सतीश भोसले सर यांनी मानले.