श्रीरामपूर शहरात नाताळ निमित्ताने बाळ येशू जन्म देखावा व संदेश ( कॅन्डल सर्विस ) मिरवणूक

श्रीरामपूर :- शनिवार दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या सर्व पंथीय मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आज रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता संत लोयोला चर्च, कॉलेज रोड येथून बाळ येशू जन्म देखाव्याची ( कॅन्डल सर्विस) मिरवणूक निघाली या मिरवणुकी करीता सर्व चर्चेचे धर्मगुरू व पाळक यांनी त्यांच्या चर्च मेंबर्सला (मंडळी) सोबत घेऊन आले होते . तसेच मिटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे ज्या ज्या चर्चला शक्य असेल त्यांनी त्यांच्या चर्चचे नांव असलेले बॅनर्स तसेच वचनांचे फलक घेऊन वेळेवर आल्यामुळे सदर मिरवणूक ही एक शिस्तबद्ध एका रांगेत व्यवस्थितपणे काढण्यास सोपे गेले व यामुळे समाजात शिस्त प्रियते बाबत चांगला संदेश दिला गेला. मिरवणुकी बाबत सूचने प्रमाणे मिरवणुकीस प्रारंभ करण्यापूर्वी प्रार्थना झाली मिरवणुकीत प्रथमतः ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर बाळ येशूचा जिवंत देखावा केलेला होता. ट्रॉलीच्या मागे सर्व रेव्ह.फादर्स व पास्टर्स होते. त्यानंतर बेथेल चर्चचा क्वायर ग्रुप सुमधूर गायनासाठी आयोजन करण्यात आल्यामुळे मिरवणुकीची शोभा वाढली. त्यामागे लहान मुले , सिस्टर्स , महिला व पुरुष दिसून आले. आलेल्या भाविकांना व्यवस्थितपणे रांगेत लावत असताना वेळेवर उपलब्ध असलेला कुठल्याही चर्चचा क्वायर ग्रुप या ठिकाणी नाताळ गीत सादर करू शकेल याची मुभा दिलेली असल्याने सुंदर नाताळगिते सादर केली. येणाऱ्या नाताळ सणा निमित्ताने बाळ येशू जन्म देखाव्याची मिरवणूक रस्त्याने जात असताना रेव्ह.फादर्स व पास्टर्स जनतेला नाताळाचा शुभ संदेश (रनिंग कॉमेंट्री) देऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. श्रीरामपूर शहरातून रस्त्याने शिस्तबद्ध पध्दतीने जात असताना राम मंदिर चौक, नगरपरिषद कार्यालय, कर्मवीर पुतळा या मुख्य तीन ठिकाणी थांबून नाताळाचा शुभ संदेश श्रीरामपूर शहरातील जनतेला दिला गेला. रस्त्याने मिरवणूक चालू असतांना ट्रॅफिक जाम होणार नाही किंवा कुठल्या प्रकारचे गालबोट लागणार नाही व कुठलेही गैरकृत्य होणार नाही याची प्रत्येक चर्च ख्रिश्चन बांधवांनी काळजी घेतलेली आहे हे दिसून आले. ख्रिश्चन समाजाची मिरवणूक आदर्श आणि चांगली असावी व त्याची दखल विधर्मीय बांधवांनी सुध्दा घ्यावी याकरिता प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन रेव्ह. फादर ज्यो गायकवाड (प्रमुख धर्मगुरू) व कमलाकर पंडित (सेवक प्रतिनिधी) यांनी केले होते. याप्रसंगी लोयोला सदनाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.ज्यो गायकवाड, रे.फा.सुनिल गायकवाड, संत झेवियर इंग्लिश मेडीयमचे प्राचार्य, रे.फा.टायटस, दिव्यावाणीचे रे.फा.अनिल चक्रनारायण , डि पाॅलचे रे.फा.थाॅमस, टिळकनगर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.मायकल वाघमारे, रे.फा.संजय पठारे, रे.फा.संजय पंडीत त्याचबरोबर संतलूक हाॅस्पिटल, कानोसा होस्टेल, टिळकनगर येथील सर्व सिस्टर्स तसेच पास्टर राजेश कर्डक, पा.आण्णा अमोलिक, पा.सतिश आव्हाट, पा.विजय खाजेकर, पा.रावसाहेब त्रिभुवन, पा.सचिन चक्रनारायण,, पा.योसेफ वडागळे, पा.सुभाष खरात, पा.योगेश ठोकळ, पा.अशोक त्रिभुवन व ऑल पास्टर फेलोशिप सर्व पाळक व त्यांची कमिटी सभासद मिरवणूकीत सहभागी होते. याप्रसंगी सर्वपक्षीय नेते यांनी नाताळाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी करणदादा ससाणे, सिध्दार्थ मुरूकुटे,, सचिन गुजर, अशोक नाना कानडे, बाबा शिंदे, रूपेश हरकल, रविंद्र गूलाटी, राजेंद्र जोशी, राजेंद्र सोनावणे, नगरसेवक दिलीप नागरे, ज्ञानेश्वर मुरकुटे, प्रकाश ढोकणे, लकी सेठी, चरण त्रिभूवन यांनी नाताळाच्या म्हणजेच ख्रिस्तजयंतीच्या सर्व ख्रिश्चन बंधू-भगिणी यांना शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर शहरात नाताळ निमित्ताने बाळ येशू जन्म देखावा व संदेश ( कॅन्डल सर्विस ) मिरवणूक