घोडेगाव येथिल सामाजिक कार्यकर्ते बाबाजी नामदेव शेगर यांचे दुःखद निधन
घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाबाजी नामदेव शेगर यांचे दुःखद निधन .
घोडेगाव येथील नारायण कॉम्प्लेक्सचे मालक बाबाजी नामदेव शेगर यांचे मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी रात्री ठिक 10 वाजता दुःखद निधन झाले आहे . बाबाजी शेगर हे नाथपंथी डवरी गोसावी समाजातील होते . सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य खूप मोठे होते . समाजामध्ये वावरतांना अनेकांच्या सुख दुःखात सामील होऊन त्यांना आधार देण्याचे काम बाबाजी शेगर यांनी केले आहे .त्यांच्या दुःखद निधनाने घोडेगाव परिसरात शोककळा पसरली आहे .त्यांच्या पश्चात आई, दोन मुली एक मुलगा, चुलत बहीण असा परिवार आहे .








