कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र कार्यक्रम - 2023 अंतर्गत अकोले, अहमदनगर येथील शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची करण्यात आली कुष्ठरोग तपासणी .

कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र कार्यक्रम - 2023 अंतर्गत अकोले, अहमदनगर येथील शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची करण्यात आली कुष्ठरोग तपासणी .

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम.

     कुसुम कुष्ठ मुक्त सुरक्षित महाराष्ट्र कार्यक्रम -2023 आतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र -विठा तालुका आकोले जिल्हा अहमदनगर येथील राजुरगाव आश्रम शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांची कुष्ठरोग विषयी आरोग्य तपासणी करण्यात आली व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कुष्ठरोगाच्या प्राथमिक लक्षणांची माहिती सांगून MDT उपचाराचे महत्व सांगितले 

     या वेळी तालुका कुष्ठरोग पर्यवेक्षक श्री बबन शिंदे, श्री समिर सय्यद यांनी उपस्थित राहून तपासणी कली.

   तपासणीत 1-MB व 3 PB एकुण 4 नवीन रुग्ण शोधण्यत आले सदर रुग्णांना तात्कळ MDT उपचाराखाली आणले तसेच रुग्णांच्या निकट सहवासितांना केमोप्रँफिलँक्सिस ( Signal dose R cin ) बाबत माहिती सांगितली .

     या कामी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी उत्तम सहकार्य केले.

   सहाय्यक संचालक मा.डॉ. राजेंद्र खंडागळे साहेब यांनी व अवैद्यकिय पर्यवेक्षक संजय दुशिंग आणि विठ्ठल मोढळे ,मोतीराम नागरगोजे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .

                 सध्या कुसुम अंतर्गत आश्रमशाळा तपासणी चालू आहे.

त्यात तालुका अकोले तालुक्यात अति दुर्गम भागात जाऊन संशई कुष्ठ रुग्णांची तपासणी करून रुग्णांना उपचार केला जातो.

आतापर्यंत( एप्रिल पासून )अकोले येथे 16 रुग्णांना उपचार सुरु केले आहेत.

2022 या वर्षातील उत्कृष्ठ काम केल्याबद्दल जी. प. कर्मचारी श्री शिंदे बी. आर. (कुष्ठ तंत्रज्ञ् )यांना राज्यात राज्य शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे.

2023 ला देखील या कर्मचाऱ्याचे काम उल्लेखनीय आहे.

यात 2023 साठी जिल्याला उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरावर(डॉ. राजेंद्र खंडागळे. सहाय्यक संचालक कुष्ठरोग अहमदनगर ) यांना गौरविण्यात आले.. ही नगर जिल्यासाठी अभिमानाची गोस्ट आहे.यासाठी श्री शिंदे बी आर यांनी संगमनेर अकोले या तालुक्यात (2022 /23)या वर्षात 122 कुष्ठरुग्ण शोधून रुग्णांना उपचार देऊन बरे केले.

ही बाब अति मोलाची आहे. यामुळे ही सर्व रुग्ण विकृतीपासून परावृत्त झाली आहेत. व सन्मानाने समाजात जीवन जगत आहेत.

सदर कामासाठी सहाय्यक संचालक डॉ. श्री राजेंद्र खंडागळे (सहाय्यक संचालक) यांचे मार्गदर्शनाने जिल्यातील कुष्ठारोगाचे कामकाज उल्लेखनीय आहे.

या कामी तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी अकोले डॉ .श्री शेटे व समीर सय्यद nma यांचे सहकार्य ही मोलाचे आहे.तालुक्यातील कर्मचारी आणि आरोग्य सहाय्यक श्री . मोहन पथवे आरोग्य कर्मचारी सुबोध भोसले यांचेही सहकार्य प्रशंसनीय आहे .