श्रीराम विद्यालयात शालेय स्तरीय गणित - विज्ञान प्रदर्शन संपन्न.

श्रीराम विद्यालयात शालेय स्तरीय  गणित - विज्ञान प्रदर्शन संपन्न.

श्रीराम विद्यालयात शालेयस्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शन संपन्न

 

भारत भालेराव

तालुका प्रतिनिधी,शेवगाव 

 

शेवगाव : दि-16.51 वे राज्यस्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शन आणि 43 वे तालुका गणित-विज्ञान प्रदर्शन 2023 निमित्त ढोरजळगाव येथील श्रीराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय स्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शनिवारी करण्यात आले यात विद्यालयातील इ 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवत आपल्या प्रतिकृती सादर केल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांच्या शुभहस्ते प्रदर्शनाची फित कापून उद्घाटन करण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत व्हावा,सृजनशीलतेला आणि विद्यार्थ्यांच्या ठायी असलेल्या नवनिर्मितीला वाव देण्यासाठी आपण या प्रदर्शनाचे आयोजन करत आहोत यातून धर्म आणि विज्ञान या समाज जीवनाच्या दोन बाजू असून धर्मावर श्रद्धा ठेवून विज्ञानातील सत्य स्वीकारून आपण संशोधक वृत्तीला चालना द्यावी असे मत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय चेमटे यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये,जेष्ठ शिक्षक भागचंद मगर,शंकर खोले,पांडुरंग व्यवहारे, सुधाकर आल्हाट,रामदास गायकवाड व गणित-विज्ञान विषयाचे शिक्षक यांचेसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रदर्शनाचे परीक्षण सचिन कुलकर्णी व सविता सातपुते यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ईश्वर वाबळे यांनी तर गणित-विज्ञान छंद मंडळाचे अध्यक्ष राहुल दहातोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.