रवांडा देशाच्या अभियंत्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठास भेट .

रवांडा देशाच्या अभियंत्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठास भेट .

*रवांडा देशाच्या अभियंत्यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठास भेट*

 

          महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जल अकादमीच्या नेतृत्वाखाली रवांडा देशाच्या 10 अभियंत्यांच्या दोन दिवसीय भेटीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी . के. ससाणे, राष्ट्रीय जल अकादमीचे संचालक श्री. मिलिंद पानपट्टी, कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुनील कदम, कृषि अभियांत्रिकी विभागाचे माजी प्रमुख डॉ. मुकुंद शिंदे ,आंतरविद्या शाखेचे विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ.आनंद चवई, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. भगवान देशमुख आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे संशोधन सहयोगी उपस्थित होते. 

           यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे यांनी राहुरी कृषि विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण बद्दल माहिती दिली.भेटी दरम्यान कृषि अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रकल्प प्रमुख डॉ.सुनील कदम यांनी कृषि विद्यापीठात कार्यरत असलेल्या काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पाविषयी आणि आयओटी सक्षम सिंचन वेळापत्रक याविषयी,डॉ. वैभव मालूजकर आणि इंजि .अभिषेक दातीर यांनी प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर ठिबक व तुषार सिंचन प्रणाली आणि त्यांचे मूल्यांकन याविषयी प्रात्यक्षिकांसह, डॉ. आनंद चवई यांनी कृषि तंत्रज्ञान केंद्राविषयी, डॉ. विजय पाटील यांनी इरिगेशन पार्क याविषयी, डॉ. डी. डी. खेडकर यांनी फिल्टरची देखभाल आणि ऑपरेशन याविषयी, इंजि. तेजश्री नवले यांनी फुले ऑटो इरिगेशन शेड्युलर, फुले मृदा संवेदक आधारित सिंचन वेळापत्रक प्रणाली, स्मार्ट फुले इरिगेशन शेड्युलर इत्यादी आयओटी सक्षम सिंचन प्रणाली विषयी सविस्तर माहिती आणि प्रात्यक्षिक दिले. फुले स्मार्ट हवामान केंद्र आणि हायपरस्पेक्टर इमेजिंग चा शेतीसाठी वापर याविषयी सविस्तर माहिती डॉ. वैभव मालूजकर यांनी दिली.

          शेतीसाठी ड्रोन आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर, तसेच ड्रोनचे प्रात्यक्षिक डॉ. गिरीशकुमार भंनगे यांनी दिले तर आयटी पार्क याविषयी सविस्तर माहिती डॉ. शुभांगी घाडगे यांनी दिली. यावेळी रवंडा येथील अभियंता म्हणाले राहुरी कृषि विद्यापीठात सूक्ष्मसिंचनामधील आय.ओ.टी., शेतीमधील ड्रोन तंत्रज्ञान व इत्यादी तंत्रज्ञानामध्ये चांगले संशोधन झाले आहे. या पद्धतीचे तंत्रज्ञान आम्ही आमच्या देशात सुद्धा राबविण्याचा प्रयत्न करणार आहोत. या दोन दिवसीय भेटीचे नियोजन डॉ.सुनील कदम, डॉ. विजय पाटील आणि डॉ. भगवान देशमुख यांनी केले.